Sindhutai Sapkal : अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात निधन, पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, हृदय विकाराच्या झटक्याने निधन

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jan 04, 2022 | 22:56 IST

Sindhutai Sapkal : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या.

Breaking News
सिंधूताई सपकाळ यांचे निधन  
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन
  • त्या ७३ वर्षांच्या होत्या.
  • त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

Sindhutai Sapkal : पुणे : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज त्यांचे निधन झाले. 

चिंधीची झाली सिंधू

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यात १४ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या त्या कुणालाच नकोशी होत्या म्हणून त्यांना चिंधी म्हटले जायचे. सिंधोताई चौथीपर्यंत शिकल्या आणि वयाच्या अवघ्या १२ व्याव वर्षी त्यांचे वीस वर्षाहून मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचे लग्न झाले होते. नंतर सिंधूताई गरोदर असताना त्यांच्याच पतीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. सिंधूताई त्यातून वाचल्या आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी माहेरी धाव घेतली पण त्यांनीही सिंधूताई यांनी स्विकारण्यास नकार दिला. तेव्हापासून त्यांनी रेल्वे स्थानकावर भीक मागण्यास सुरूवात केली. भीका मागून त्या गुजराण करत होत्या, तेव्हापासून त्यांनी टाकून दिलेल्या मुलांचे पालकत्व स्विकारले. आपल्या मुलीमुळे इतर मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी आपली मुलगी दगडू शेठ हलवाई मंदिराच्या विश्वस्तांना दत्तक दिली. 
 

माईंनी मुलांना सांभाळण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून सिंधूताई सकपाळ अनाथांच्या माई झाल्या. सिंधूताई सपकाळ यांनी बाल निकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, ममता बाल सदन आणि सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था अशा संस्था स्थापन केल्या.  अनाथ बालकांना सर्व शिक्षण देणे, त्यांच्या जेवणाची, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धत करून देणे, शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीमार्गदर्शन, आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देण्याचे त्यांच्या विवाहाचे आयोजन अशी अनेक कार्य त्यांच्या संस्थेमार्फत करण्यात आली आहेत.
 

पद्मश्रीने सन्मान

त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. फक्त पद्मश्रीच नव्हे तर सिंधूताईंना राष्ट्री आणि आंतराराष्ट्रीय मिळून ७५० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित मी सिंधूताई सपकाळ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. 

धनंजय मुंडे 

सुप्रिया सुळे 

रोहित पवार 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी