son in law molested mother in law : पुणे : जावयाने सासूशी बोलताना अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. मुलीला आत्ताच माझ्यासोबत नांदायला पाठवा, असा तगादा जावयाने सासुसोबत लावला होता. मुलीला आत्ताच माझ्यासोबत नांदायला पाठवा, नाहीतर तुम्हीचं माझ्यासोबत नांदायला चला, अशी अर्वाच्य भाषा जावयाने वापरली. एवढच नाहीतर जावयाने थेट सासूचाच हात धरला असल्याचंही समोर आले आहे. दरम्यान, जावयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास भोर तालुक्यातील एका गावात घडली आहे.
अधिक वाचा ; आज मुंबईत 11 वाजता मोठी घडामोड, फडणवीस पोहोचणार शिवतीर्थावर
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवरा-बायकोचे भांडण झाल्यानंतर बायको माहेरी निघून गेली होती. सदर नवरा – बायकोत सतत भांडण होत होती. या दोघांचे लग्न काही वर्षपूर्वी मोठय थाटा माटात झाले होते. लग्नानंतर दोघांचा संसार काही दिवस सुखात सुरु होता. मात्र, काही दिवसांनी दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यामुळे, बायको नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली. त्यानंतर नुकतेच काही दिवसांनी नवरा तिला नेण्यासाठी सासरवाडीत पोचला त्याने वैशालीला परत पाठवा, असे सासुबाईला सांगितले. मात्र पोरं लहान आहेत व बाहेर पाऊस आहे, आज राहा व दोघेही उद्या मुलाबाळांसह जा, असे सांगितले. मात्र त्यावर जावयाने पोरीला पाठवणार नसाल तर तुम्हीच चला, अशा अर्वाच्य भाषेत सासुबाईचाच विनयभंग केला असल्याची घटना घडली. सदर घटनेनंतर सासूबाईने जावयाविरोघात तक्रार दाखल केली.
अधिक वाचा ; आज राज्यात कशी असेल पावसाची स्थिती, हे आहेत सध्याचे अपडेट्स
जावयाने सासूला अर्वाच्च भाषेत बोलल्यानंतर सासरे आणि इतरांनी जावयाला समज दिली होती. मात्र, त्यानंतर आणखी वाद झाला व याचे रुपांतर हाणामारी झाले. त्यानंतर सासुबाईंनीच जावयाविरुद्ध तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी जावयाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याची रवानगी येरवाडा कारागृहात केली आहे.
अधिक वाचा ; मुंबईत आजपासून 75 दिवस मोफत Booster Dose,पालिकेनं केलं आवाहन