SSC HSC Exam 2022: दहावी-बारावीसाठी शाळा 'या' गोष्टीवर अधिक भर देणार 

SSC HSC Exam news in marathi : फेब्रुवारी महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा गेल्या दोन वर्षांपासून कमी झालेला लेखनाचा सराव करण्यासाठी आता शाळा सरसावल्या आहेत.  परीक्षेवेळी लिखाणाची आणि परीक्षा देण्याची सवय राहावी यासाठी अधिकाधिक सराव परीक्षा (Practics Test) सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहेत.

ssc hsc exam 2022 Pune City and District schools are conducting practice exams for students education news in Marathi
SSC HSC Exam : दहावी-बारावीसाठी शाळांचा सराव परीक्षांवर भर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दहावी-बारावीसाठी पुण्याती शाळांचा सराव परीक्षांवर भर
  • सर्व शाळांमध्ये अधिकाधिक सराव परीक्षा घेण्याचा विचार
  • लिखाणाचा सराव होण्यासाठी या परीक्षांवर भर

SSC HSC News updates in Marathi ।  पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना त्याची  तयारी आणि विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव व्हावा म्हणून शाळांमध्ये सराव परीक्षा (Practics Test) घ्यायला  पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांनी  सुरुवात केली आहे.  सर्व शाळांमध्ये तीन ते चार सराव परीक्षा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. परीक्षेवेळी अडचण निर्माण होऊ नये म्हणून शाळांनी हा पुढाकार घेतला आहे. 

पुढी महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा गेल्या दोन वर्षांपासून कमी झालेला लेखनाचा सराव करण्यासाठी आता शाळा सरसावल्या आहेत.  परीक्षेवेळी लिखाणाची आणि परीक्षा देण्याची सवय राहावी यासाठी अधिकाधिक सराव परीक्षा (Practics Test) सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये सराव परीक्षा (Practics Test) सुरू झाल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने (MSBSHSE) परीक्षा वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सूचित केल्याने सराव परीक्षांचे आयोजन केले जात आहे. 

अधिक वाचा : SSC HSC EXAM 2022: दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

या परीक्षांच्या दरम्यान विज्ञान (Science) आणि गणित (Maths) या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. भाषेचे विषय, इतिहास-भूगोल यांसारख्या विषय विद्यार्थ्यांना समजण्यास तुलनेने सोपे वाटत आहेत.  मात्र, लॉग डाऊन आणि शाळा बंद असल्याने विज्ञान आणि गणिताच्या अनेक संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना जड जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यामुळेच परीक्षांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे काही जादाचे तास (Extra Class) ऑनलाइन आणि ऑफलाइन (Online And Off line ) पद्धतीने घेतले जात आहेत. शहरी भागामध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग घेऊन गणित आणि विज्ञानाचे जादाचे वर्ग   (Extra Class)सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.


परीक्षा वेळेतच होणार

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणतेही बदल होणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी  (MSBSHSE) यांनी पुन्हा स्पष्ट केले. परीक्षांच्या वेळ‌ापत्रकात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही. तसा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षांची तयारी करावी, असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा :  HSC SSC Practical Exam Date | विद्यार्थ्यांनो लक्ष द्या,  इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सराव परीक्षांवर (Practical Exam) भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे शाळांमध्ये परीक्षाही सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव होणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणाद्वारे (online)  अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. तो प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कळला का, याचाही अंदाज या परीक्षांच्या माध्यमातून घेता येईल, असे  पुणे मटाशी बोलताना अहिल्यादेवी हायस्कूलच्या शिक्षिका  चारुता प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

शहरी आणि ग्रामीण भागात सराव परीक्षा घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. परीक्षांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात येत असून, त्याप्रमाणे जे विषय फारसे समजले नसतील त्यांचे ज्यादाचे तास घेऊन विद्यार्थ्यांकडून तयारी करवून घेतली जात आहे. ग्रामीण भागातील काही भाग वगळला तर बहुतांश ठिकाणी अभ्यासक्रम (syllabus) पूर्ण झाला आहे, असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी