Mesma Act एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा,आत्तापर्यंत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर होणार मेस्मा कायद्यान्वये कारवाई होणार, काय आहे मेस्मा कायदा

st worker will be prosecute under mesma act : जे  एसटी कर्मचारी कामावर हजर होत नाहीत त्यांच्यावर मेस्माअंतर्गत (Mesma Act) कारवाई केली जाईल, असा इशारा एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर (Shekhar Channe) चन्ने यांनी दिला

st worker will be prosecute under mesma act
या एसटी कर्मचाऱ्यांवर होणार मेस्मा कायद्यान्वये कारवाई होणार 
थोडं पण कामाचं
  • ऑक्टोबर महिन्यातील आणि नोव्हेंबर मधील वेतनचिट्ठी पाहिली किमान नऊ हजार रुपयांची वाढ झाली
  • ज्यांनी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे त्यांच्यावर प्रशासकिय कारवाई
  • आतापर्यत जे  एसटी कर्मचारी कामावर हजर होत नाहीत त्यांच्यावर मेस्माअंतर्गत कारवाई केली जाईल

Mesma Act पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. वेतन वाढ करावी त्याचसोबतस एसटीचे महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र, तोडगा निघत नव्हता अखेर एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र, काही कर्मचारी आतापर्यत कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे अद्याप कामावर हजर न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यत जे  एसटी कर्मचारी कामावर हजर होत नाहीत त्यांच्यावर मेस्माअंतर्गत (Mesma Act) कारवाई केली जाईल, असा इशारा एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर (Shekhar Channe) चन्ने यांनी दिला आहे. संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर मोठी खळबळ उडाली असून, संप पूर्णपणे गुंडाळला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

ऑक्टोबर महिन्यातील आणि नोव्हेंबर मधील वेतनचिट्ठी पाहिली किमान नऊ हजार रुपयांची वाढ झाली

साडे सतरा टक्के करा पैकी सरकार एसटी महामंडळाला १० टक्के कर पुन्हा माघारी करत असतो. आणि दुसरी बाब डीजेझल वरील व्हॅट कमी होण्याबाबत तर ही केवळ अफवा आहे. त्याचबरोबर विलीनीकरण झालं तर १७.५० टक्के प्रवाशी कर, २७ टक्के व्हॅट कमी होईल अशी चर्चा आहे. मात्र, याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार नाही. असं शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळं वेतनात वाढ झाल्यामुळं डीए, एचआरए आणि दरवर्षी मिळणारी वेतनवाढ या सर्व बाबींमध्ये वाढ होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील आणि नोव्हेंबर मधील वेतनचिट्ठी पाहिली किमान नऊ हजार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे. आम्ही मुळं पगारात पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. असं शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे. 

ज्यांनी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे त्यांच्यावर प्रशासकिय कारवाई

ज्यांनी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे त्यांच्यावर प्रशासकिय कारवाई तर होईलच सोबतच फौजदारी कारवाई देखील होणार आहे, असंही शेखर चन्ने म्हणाले आहेत. दरम्यान, मेस्माअंतर्गत कायद्यांर्तगत जे कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्यासाठी मदत करतात. जे संप चालवण्यासाठी पैसा पुरवतात. तसेच जे अफवा पसरवतात किंवा जे संपात सहभागी झाले आहेत, यांच्यावर कारवाई होते. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अटक होते शिवाय यामध्ये जामीन देखील मिळत नाही. नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या. त्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी मेसमा कायदा लावण्यात येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी