पुण्यात विचित्र घटना, नवऱ्याने मित्रालाच सांगितलं बायकोवर बलात्कार कर! 

Pune Rape Case: पुण्यातील कात्रजमध्ये एका महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पत्नीने नवरा आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.   

strange incident in pune husband tells friend to rape on his wife
पुण्यात विचित्र घटना, नवऱ्याने मित्रालाच सांगितलं बायकोवर बलात्कार कर!   |  फोटो सौजन्य: Representative Image

पुणे: पुण्यातील कात्रजमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेवर तिच्या पतीच्याच मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पतीच्या परवानगीनेच मित्राने त्याच्या बायकोवर बलात्कार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसात तक्रार देखील दाखल केली. ही घटना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. ज्याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीच्या मित्राला अटक केली असून आता त्याची कसून चौकशी सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी आरोपी सुरेश शिंदे याने अचानक रुममध्ये घुसून आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. पीडित महिला आणि तिचा पती हे पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये राहत होते. हे दोघेबी पुण्यातच कामाला होते. त्यामुळे ते हॉस्टेलला राहत होते. मात्र, गेल्या वर्षी अचानक या विवाहित महिलेसोबत अत्यंत भयंकर प्रकार घडला. जेव्हा सुरेश शिंदे याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर याबाबत तिने आपल्या पतीला माहिती दिली. पण त्यावेळी नवऱ्याने बायकोला जे काही सांगितलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 'मीच सुरेशला तुझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितलं होतं.' असं त्याने आपल्या बायकोला सांगितलं. या संपूर्ण प्रकारने पीडित महिला अक्षरश: हादरून गेली. 

या घटनेनंतर महिलेने पुण्यात न राहण्याचा निर्णय घेतला आणि ती थेट तिच्या माहेरी म्हणजेच परभणीला निघून गेली. त्यानंतर तिने याप्रकरणी पोलीस तक्रार देखील नोंदवली. सध्या हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार मुंबईतील जोगेश्वरी इथे घडला होता. इथेही पतीने आपल्या फेसबुक मित्रांना पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितलं होतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षा ड्रायव्हरने आपल्या २३ वर्षीय पत्नीला मुंबई उपनगरातील जोगेश्वरी येथे सिनेमा दाखविण्याच्या बहाण्याने आणलं होतं. पण तो तिला सिनेमा दाखविण्याऐवजी एका भलत्याच ठिकाणी घेऊन गेला. तो ज्या ठिकाणी पत्नीला घेऊन गेला तिथे आधीच त्याचे दोन मित्र अभिषेक आणि मंगेश यादव हे हजर होते. हे दोघेही आरोपीचे फेसबुकवरील मित्र आहेत. 

आरोपीने मित्रांना आपल्या पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितला. त्यानंतर त्याने स्वत: देखील आपल्या पत्नीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिला पालघर पोलीस ठाण्यात पोहचली आणि तिने घडला प्रकार पोलिसांना सांगितला. ज्यानंतर पालघर पोलिसांनी हे प्रकरण जोगेश्वरी पोलीस ठाण्यात वर्ग केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी