Pune । 34 विद्यार्थ्यांच्या धावत्या बसमधून चालकाने उडी मारली अन् ..., पहा थरारक Video

Pune accident : खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना मोरगावच्या सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवले. धावत्या बस उडी मारून चाकाखाली दगड टाकून त्यांनी बस थांबवली.

Student bus brake failed in Pune, driver jumped
Pune । 34 विद्यार्थ्यांच्या धावत्या बसमधून चालकाने उडी मारली अन् ..., पहा थरारक Video  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सहलीला जाणाऱ्या बसचा ब्रेक निकामी
  • चालकाने धावत्या बसमधून उडी मारली
  • बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

पुणे : खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. दरम्यान, ड्रायव्हरने धावत्या बसमधून उडी मारून बस रोखण्याचा प्रयत्न केला. भोर, जि. पुणे येथे घडलेल्या या थरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Student bus brake failed in Pune, driver jumped)

अधिक वाचा : KCR यांनी टाकले महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल, अब की बार किसान सरकार'चा नारा

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, मोरगाव, ता. बारामती येथील एका खासगी क्लासचे विद्यार्थी आणि शिक्षक मांढरदेव व रायगडला सहलीला निघाले होते.  ही बस विद्यार्थ्यांना घेऊन वरंदघाट मार्गे रायगड किल्ल्यावर जात होती. तेव्हा भोरच्या चौपाटी संकुल परिसरात अचानक बसचा ब्रेक फेल झाला. दरम्यान, ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत रस्त्यावरील लोकांना सावध केले आणि स्वतः चालत्या बसमधून उडी मारली. त्यानंतर बसच्या चाकाखाली दगड टाकून त्यांनी बस थांबवली.

अधिक वाचा : Kasba Chinchwad by election 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवार, राज ठाकरे, नाना पटोलेंना फोन; पोटनिवडणुकीसाठी केले खास आवाहन
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये बस चालकाने परिस्थितीला न घाबरता धाडस दाखविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये एकूण 34 विद्यार्थी होते.

खासगी क्लासचे ३४ विद्यार्थी घेऊन बस मोरगावहून मांढरदेवीकडे जात असताना भोर चौपाटीजवळ बसचा ब्रेक एअर पाइप फुटला. ब्रेक निकामी झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने उडी मारली. यादरम्यान रस्त्याने जाणारे काही लोकही चालकाच्या मदतीसाठी धावले. त्यामुळे बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी