विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करावे 

पुणे
रोहन जुवेकर
Updated Nov 21, 2021 | 17:12 IST

Students should apply online and offline for caste certificate verification जात पडताळणी समितीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली  आहे.

Students should apply online and offline for caste certificate verification
विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करावे  
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करावे 
  • बार्टीने दिली माहिती
  • ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वेग मंदावल्यामुळे ऑफलाईन पर्याय पण दिला

Students should apply online and offline for caste certificate verification पुणे: जात पडताळणी समितीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली  आहे.

शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेल आहे. त्यामुळे विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करणेबाबत बार्टीकडे विनंती केलेली होती. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने, अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज १७ ते २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सुचना  सर्व जातपडताळणी समित्यांना बार्टी  मार्फत परिपत्रकान्वये देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी