Pune Corona Patient Suicide: पुण्यातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णाची आत्महत्या

पुणे
उमेर सय्यद
Updated Jul 06, 2020 | 19:18 IST

Pune Corona Patient Suicide: पुण्यातील कोंढवा येथील सिंहगड इन्सिट्यूट येथे असणाऱ्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Covid Patient Suicide
कोरोना रुग्णाची आत्महत्या (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • पुण्यातील कोंढवा येथे कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या
  • कोरोना रुग्णाने कोव्हिड केअर सेंटरमध्येच गळफास घेत केली आत्महत्या
  • सिंहगड इन्सिट्यूट येथील कोव्हिड केअर सेंटरमधील धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील कोंढवा येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Pune) कोंढवा येथे एका कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली. (Corona Positive Patient Suicide) सिंहगड इन्स्टिट्यूमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोव्हिड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center) गळफास घेऊन रुग्णाने आत्महत्या केल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने यांनी आज (सोमवार) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. 

कोव्हिड सेंटर येथे ६० वर्षीय रुग्ण आणि त्यांचा २७ वर्षीय मुलगा हे एकत्रच होते. सकाळच्या सुमारास जेव्हा त्यांचा व मुलगा सेंटर परिसरात नाष्टा आणण्यासाठी गेलेला असतानाच वडिलांनी आपलं जीवन संपवलं. ६० वर्षीय वडिलांनी बाथरुममध्ये जाऊन गळफास घेतला. कोंढवे येथील येवले वाडी येथे हे सेंटर असल्याची माहिती समजते आहे. जेव्हा पोलिसांना याप्रकरणी कळविण्यात आलं तेव्हा त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतील. त्यानंतर तात्काळ पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, या बातमीला पुणे महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. 

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ

महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहे. सुरुवातीपासूनच पुण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं आहे. अद्यापही म्हणावं तसं कोरोना नियंत्रणात आलेला नाही. त्यातच आता एका कोरोना रुग्णाने कोव्हिड सेंटरमध्येच आत्महत्या केल्याचं समोर आल्याने पुण्यात एकच खळबळ माजली आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आतापर्यंत २८,१४२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी १३,४०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३८६४ रुग्णांवर सध्या उपाय सुरु आहेत. तर आतापर्यंत ८७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ६५५५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २,०६,६१९ एवढी झाली आहे. तर ३६५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १,११,७४० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८६०७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात १५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ८८२२ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी