एका गुणामुळे हुकली होती संधी, एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Suicide of a young man preparing for MPSC exam : पुण्यात आणखी एका एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.

Suicide of a young man preparing for MPSC exam
एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती
  • कोरोनाचे वाढते संकट आणि आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत
  • अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे

पुणे : पुण्यात आणखी एका एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. काही महिन्यापासून एमपीएससीची परीक्षा पुढे – पुढे ढकलली जात असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढते संकट आणि आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामुळे अनके वर्षे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्याला नैराश्य येत असल्याचं पहायला मिळत आहे, आणि याच नैराश्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतं असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, अशीच घटना नुकतीच पुण्यात घडली घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती

आत्महत्या केलेला युवक अमर मोहिते हा काल मित्रांना भेटला होता. त्यावेळी तो निराश वाटत असल्याची माहिती अमर मोहिते यांच्या मित्रांनी दिली आहे. अमर मोहिते हा तसा अभ्यासात देखील खूप हुशार असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, तो पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. मागील २ वर्षापासून तो पीएसआईच्या परीक्षेची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. त्यातूनच आज त्याने रूमवर आत्महत्या केली. मराठा आरक्षण टिकलं असतं तर त्याची संधी हुकली नसती असं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वीही एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरने केली होती आत्महत्या

एसपीएससीची (mpsc) तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या (mpsc student sucide) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान , गेल्या काही दिवसांपूर्वीच एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरची आत्महत्या ताजी असतानाच दौंड तालुक्यातील (daund taluka) देऊळगावगाडा या गावात ही घटना घडली आहे. एसपीएससीची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. कारण या विध्यार्थ्याने आत्महत्या करण्यापुर्वी एक चिट्ठी देखील लिहून ठेवली आहे. सदर तरुणाने एमपीएससीची तीन वेळा परीक्षा दिली होती, या तरुणाला परीक्षेत यश आले नाही. त्यामुळे तो निराश होता. त्यानंतर त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे वय अवघे २५ वर्षे होते.

दरम्यान, नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव मल्हारी नामदेव बारवकर असे नाव आहे. मल्हारी नामदेव बारवकर या तरुणाने  एमपीएससीच्या परीक्षेचे त्याने तीन पेपर दिले होते. मात्र, त्याला या परीक्षेत यश मिळाले नाही.  मल्हारी एमपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करत होता. त्याचे वय अवघे २५ वर्षेइतके होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल सायंकाळी ४  वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मल्हारी बारवकरचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी पाटस पोलीस स्टेशनला दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी