पुणे : पुणे हिंजवडी येथे एका कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) खासदार (MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडलीय. सुदैवाने हा प्रकार लवकर लक्षात आल्याने अनर्थ टळला आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणताही इजा झाली नाही. खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली. (Supriya Sule's saree caught fire during an event in Pune)
हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचे आज उद्घटन होतं. याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बोलवलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी टेबलावलर ठेवलेल्या दिव्यामुळे त्यांच्या साडीला आग लागली. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने साडीला आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तात्काळ साडीची आग विझवण्यात आली.
यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणताही इजा झालेली नाही. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे पुढील कार्यक्रमाला गेल्या. यावेळी त्यांनी इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. सुप्रिया सुळे यांचे आज पुण्यात अनेक कार्यक्रम आहेत.