तरुणीने माध्यमांसमोर येऊन शिवसेनेच्या नेत्यावर केले गंभीर आरोप, म्हणाली गर्भपात झालेले ते बाळ कुचिक यांचचं

Taking a press conference, the young woman made serious allegations against the Shiv Sena leader : काही दिवसांपूर्वी एका तरुणीने शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाता आता नव्या घडामोडी घडल्या आहेत.

Taking a press conference, the young woman made serious allegations against the Shiv Sena leader
तरुणीने माध्यमांसमोर येऊन शिवसेनेच्या नेत्यावर केले गंभीर आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी – पिडीत महिला
  • संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली पण मिळाली नाही - पिडीत तरुणी
  • रघुनाथ कुचीक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असल्याचं पिडीतेन म्हटलं आहे

पुणे  : काही दिवसांपूर्वी एका तरुणीने शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. दरम्यान, माझा गर्भपात झाला असून, माझं गर्भपात झालेलं बाळ हे रघुनाथ कुचिक यांचंच असल्याचं म्हटलं होत. पीडितेने केलेल्या गंभीर आरोपानंतर कुचीक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही असं वैद्यकीय रित्या सिद्ध झालं असल्याचं सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचीक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असल्याचं पीडितेने म्हटलं आहे. पुढे बोलताना तिने म्हटलं आहे की, रघुनाथ कुचीक नेहमी मला मेसेज करायचे, आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मोर्फ करून वापरला गेला, मात्र तसं नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट सरकारी असते. ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ती  फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचं तरुणीने म्हटलं आहे.

अधिक वाचा : 'एप्रिल फूल'निमित्त मस्करी करण्याचा या आहेत भन्नाट आयडिया

रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी – पिडीत महिला

पिडीत महिलेने रागुनाथ कुचिक यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात जाणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता, पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी देखील पिडीतीने केली आहे. रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत असल्याचं पीडितेने म्हटलं आहे.

अधिक वाचा ; MS Dhoni income: गेल्या वर्षात धोनीची तब्बल इतकी कमाई वाढली

संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली पण मिळाली नाही

पुढे बोलताना पिडीत तरुणीने म्हटलं आहे की, “संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली पण मिळाली नाही. कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले" असं तरुणी म्हणाली. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली तसेच न्याय मलाही मिळावा अशी अपेक्षा पीडित तरुणीने आज बोलताना व्यक्त केली आहे.

अधिक वाचा : तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कराचा लाभ 

चित्रा वाघ या पोलिसांवर खोटे आरोप करत आहे – रुपाली चाकणकर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर लैंगिक अत्याचाराचागंभीर आरोप करण्यात आला होता. सदर आरोपानंतर रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण लागले असल्याचं समोर आले आहे. रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तर, चित्रा वाघ या पोलिसांवर खोटे आरोप करत आहे, असं म्हणत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी