VIDEO: लेक गमावलेल्या आईची व्यथा ऐकून प्रविण दरेकरांना अश्रू अनावर

Pravin Darekar: राज्यातील विविध भागांत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांनी गमावले. शेतकऱ्यांच्या या नुकसानाची पाहणी करुन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न राजकीय नेते करत आहे

Pravin Darekar
VIDEO: अन् प्रविण दरेकरांना अश्रू अनावर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सांगली दौरा
  • अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांची दरेकरांनी घेतली भेट, प्रविण दरेकर यांना अश्रू अनावर 

सांगली : परतीच्या पावसाने राज्यात खूप मोठे नुकसान केले आहे. राज्यातील विविध भागात अतिवृष्टी (Heavy rainfall) झाली, वादळीवारा झाला काही ठिकाणी पूर आला. या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Farmer lost crops) झाले आहे. शेतकऱ्यांची शेत पिके वाहून गेली यासोबतच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. तर पूराच्या पाण्यात काहींनी आपले प्राणही गमावले आहेत. सांगली जिल्ह्यातील तडवळे गावातील शुभम हा तरुणही पाण्यात वाहून गेला. या कुटुंबाची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले.

सांगली जिल्ह्यातील तडवळे गावात राहणारा २२ वर्षीय शुभम जाधव हा अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला. तरुण मुलगा गमावल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या जाधव कुटुंबाची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. प्रविण दरेकर हे जाधव कुटुंबाच्या घरी दाखल झाले तेव्हा शुभम जाधव या तरुणाच्या आईने हंबरडा फोडला. माझे पिल्लू कुठे दिसत नाही, माझे लेकरू मला द्या, आम्हाला आधार देणारा निघून गेला, पावसाने आमचा घात केला अशा शब्दांत या आईने आपली व्यथा प्रविण दरेकर यांच्यापुढे मांडली.

जाधव कुटुंबाची भेट घेतल्यावर प्रविण दरेकर म्हणाले, कुटुंबाचे दु:ख ऐकताना मलाही अश्रू अनावर झाले, अतिवृष्टीतील अशा प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही.

प्रविण दरेकर यांनी आपल्या सांगली दौऱ्यात आटपाडी तालुक्यातल्या अग्निशमन गावाला भेट दिली. या गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे पाण्यात वाहून गेले होते. रस्ते खचले होते आणि पाण्याखाली गेले होते यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. या गावाला भेट दिल्यावर प्रविण दरेकर म्हणाले, हे सर्व नव्याने निर्माण करण्याचं आव्हान सरकारपुढे आहे, चालढकल करून वेळ घालवून चालणार नाही.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत: मुख्यमंत्री

तर तिकडे उस्मानाबादचा दौरा केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय़ घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यंना मदत पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी