TET Exam Scam Case: दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

पुणे
भरत जाधव
Updated Dec 20, 2021 | 15:52 IST

TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे.

TET Exam Scam Case
TET परीक्षा घोटाळा : तुकाराम सुपेंन मेहुण्याकडे लपवला होता पैसा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हा संपूर्ण घोटाळ्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे.
  • दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
  • शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

TET परीक्षा घोटाळा प्रकरण :मुंबई:  TET परीक्षा पेपरफुटी (Exam Paper Leak) प्रकरणात संदर्भात राज्य शासनाच्या (State Government) परीक्षा विभागाकडून (Exam Department) प्रमुख तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे. दरम्यान पेपर फुटीच्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांनी सुप यांच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली असून यात 2 कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. 

याआधीही तुकाराम सुपेंच्या घरात याआधी 17 डिसेंबर रोजी छापा टाकण्यात आला होता तेव्हा पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. यासह पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. आज टाकलेल्या दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशाचं घबाड सापडले आहे. पोलिसांना तपासात सुपेंच्या घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केले आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे.

 म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली.

4 कोटी 20 लाख रुपयांचा घोटाळा

हा संपूर्ण घोटाळ्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच, तुकाराम सुपेकडूनच 5 तोळे दागिने आणि 5.5 लाखांची एफडी असलेली कागदपत्रे सुद्धा सापडली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी