पेढ्यातून उंदराचं औषध देऊन केला अल्पवयीन मुलीचा खून, आत्महत्या असल्याचाही केला बनाव

accused killed a minor girl in pune : अल्पवयातील प्रेम किती घातक आणि धोकेदायक असतं याची कल्पना पुण्यातील आंबेगावमधील लोकांना आली. प्रियकराकडे अल्पवयीन प्रेयसी लग्नाचा हट्ट करत असल्याने प्रियकरांना तिचा खेळ संपवला. उंदिर मारण्याचे औषध देऊन प्रियकराने अल्पवयीन मुलीचा खून केला. त्यानंतर प्रेयसीने आत्महत्या केल्याचा बनाव करत प्रियकराने त्या प्रकरणात सुटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर प्रियकरचं हैवान असल्याचं समोर आले आहे.

The accused killed a minor girl in pune
पेढ्यातून उंदराचं औषध देऊन केला अल्पवयीन मुलीचा खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हत्या करून आरोपीने आत्महत्या असल्याचा बनाव
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक
  • 2 वर्षापासून आरोपीचे पिडीतेसोबत होते प्रेमसंबंध

पुणे : अल्पवयातील प्रेम किती घातक आणि धोकेदायक असतं याची कल्पना पुण्यातील आंबेगावमधील लोकांना आली.  प्रियकराकडे अल्पवयीन प्रेयसी लग्नाचा हट्ट करत असल्याने प्रियकरांना तिचा खेळ संपवला. उंदिर मारण्याचे औषध देऊन प्रियकराने अल्पवयीन मुलीचा खून केला. त्यानंतर प्रेयसीने आत्महत्या केल्याचा बनाव करत प्रियकराने त्या प्रकरणात सुटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर प्रियकरचं हैवान असल्याचं समोर आले आहे. 

हत्या करून आरोपीने आत्महत्या असल्याचा बनाव असल्याचा बनाब केला होता. मात्र, पोलीस तपासून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात घडली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्या मुलीने तरुणाकडे सतत माझ्याशी लग्न कर अशी मागणी केली. अल्पवयीन तरुणी सतत लग्नाची मागणी करत असल्याने तरुणाने तिची थेट त्याने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा बनाव केला. अखेर हे सगळं प्रकरण पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 वर्षापासून आरोपीचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते, अशीही माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा ; मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेटस ठेवून झाला मृत्यू

पेढ्यात उंदराचं विष टाकून केली होती हत्या

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव रोहिदास करोटे असं आहे. आरोपी रोहितचे आणि अपल्वायीन मुलीचे गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान, आरोपीने पिडीतेसोबत अनेकदा लैंगिक अत्याचार देखील केले. त्यानंतर पिडीत मुलगी आरोपीच्या मागे माझ्याशी लग्न कर म्हणून मागे लागली. यावेळी आरोपीने जबरदस्ती पेढे खायला दिला होता. या पेढ्यात उंदराचं विष कालवण्यात आलं होतं, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणारी ही घटना हत्याकांडाचा प्रकार होता, हे आता उघड झाला आहे.

अधिक वाचा ; उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार 

रोहितने स्वतःला वाचवण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला होता

आरोपी रोहिदास याने पीडितेला पेढ्यातून उंदराचं औषध दिलं होतं. त्यात पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी घोडेगाव पोलीस तपास करत होते. तपासाअंती रोहिदास याने रचलेलं संपूर्ण कट उघडकीस आला असून आता त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. रोहिदास याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने उंदराचं औषध देऊन तिचा खून केला होता. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला होता. पण अखेर पोलिसांच्या तपासात हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं. घोडेगाव पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

अधिक वाचा ; स्वत:हून राजीनामा द्या, मिळतील चांगले फायदे, अ‍ॅमेझॉनची ऑफर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी