पुणे : दिल्ली येथून पुण्यात आलेला तरुण लोणावळा येथील घनदाट जंगलात बेपत्ता झाला होता. अखेर या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. फरहान शहा असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. रस्ता शोधत असताना ३०० ते ४०० फुटांवरून दरीत कोसळला असल्याचं प्रथमदर्शी लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, सदर तरुण ज्या रस्त्याने जगलात गेला तो येताना रस्ता विसरला. त्यामुळे तो जंगलातचं भटकत गेला होता. फरान सेराजुद्दीन हा एका रोबोट कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. फरान लवकर मिळावा यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी फरानला शोधण्यासाठी १ लाख रुपयाचे बक्षीस देखील जाहीर केले होत.
अधिक वाचा ; गुजरात-राजस्थान सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामान
गेल्या चार दिवसांपासून फरहानचा पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू, कुरवंडे गावचे ग्रामस्थ शोध घेत होते. अखेर, मंगळवारी आज म्हणजेच २४ मे रोजी आयएनएस शिवाजी येथील जवानांना दरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर एनडीआरएफचं (NDRF) पथक दरीत उतरलं. त्यावेळी तो मृतदेह फरहानचा असल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिली.
अधिक वाचा ; भूत योनीपासून मुक्त होण्यासाठी अपरा एकादशी आहे सर्वोत्तम
फरान जाताना ज्या रस्त्याने गेला तो रस्ता येताना विसरला, आपण रस्ता चुकलो आहे अस फारानच्या लक्षात येताच त्याने भाऊ आणि आई वडिलांना फोन, मॅसेज करून याची कल्पना दिली होती. अशी माहिती लोणावळा शहर पोलीस देत आहेत. फरान हा दिल्ली येथील रहिवासी असून, तो पुण्यात काही कामानिमित्त आला होता. तिथून तो लोणावळ्यात आला आणि एकटाच नागफणी पॉईंट येथे फिरण्यास गेला.
अधिक वाचा : लग्नमंडपात सुरेल आवाजात गाणं म्हणताना महिलेचा मृत्यू
दरम्यान, फरान शुक्रवारी पुण्यात त्याच्या काही कामानिमित्त आला होता, तिथून तो लोणावळा येथे फिरायला गेला. फरान सोबत कोणीही नव्हते तो एकटाच होता. फरान ज्या रस्त्याने जंगलात गेला येताना तोच रस्ता चुकला. त्याने तात्काळ भाऊ, आई, वडील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. याबाबत त्याने माहिती दिली, लोणावळा पोलिसांशी कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत फरान चा मोबाईल बंद झाला होता. अशी माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली आहे.