molestation Case : व्याकरण शिकवणाऱ्या मास्तरचं होतं खराब चरित्र, क्लासमधील मुलींचा करायचा विनयभंग, 11 विद्यार्थिनीं केलीय तक्रार

पुणे
भरत जाधव
Updated Oct 26, 2022 | 09:50 IST

इयत्ता सहावी वेगवेगळ्या तुकडीत शिकणाऱ्या 11 मुलींनी इंग्रजीच्या शिक्षकाविरुद्धात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून शिक्षकाचा शोध घेत आहे. मुलींचा विनयभंग झाल्याचं पोलिसांनी मान्य केलं आहे, परंतु पीडित मुलींनी अद्याप शाळेच्या मुख्याध्यापकांकडे शिक्षकाची तक्रार केली नाहीये. या प्रकरणात बळी ठरलेल्या एका विद्यार्थिनीचं समुपदेश करत असताना त्या विद्यार्थिनीने कबूल केलं की, तिला इंग्रजीचे शिक्षकांनी तिला अयोग्यप्रकारे स्पर्श केला.  

Teacher turned murderer, molested 11 girl in 6th class
शिक्षक बनला नराधम, सहावीमधील 11 मुलींचा विनयभंग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इयत्ता सहावी वेगवेगळ्या तुकडीत शिकणाऱ्या 11 मुलींनी इंग्रजीच्या शिक्षकाविरुद्धात तक्रार दाखल केली आहे.
  • 11 मुलीची छेड काढण्यात आल्याचा आकडा मुलींनी बैठक घेऊन काढला आहे.
  • पॉस्को कायदा, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्याला (Pune) शिक्षणाचे माहेर घर म्हटलं जातं. परंतु या शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर  (minor girls) घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. वालचंदनगरमध्ये तर एका नराधम सरकारीने शिक्षकाने (Teacher)आपल्या शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे.  विद्यार्थ्यांचं इंग्रजी व्याकरण शिकवत-शिकवत सहावीच्या वर्गशिक्षकाचं चरित्र खराब झालं. या नराधमाने इयत्ता सहावीमधील 11 मुलींचा विनयभंग(molestation) केला असून प्रकरणी वालचंदनगर (Walchandnagar)पोलीस स्टेशनमध्ये( Police Station) गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी शिक्षक फरार झाला आहे. (The character of the teacher who taught grammar was bad, molesting the girl in the class)

अधिक वाचा  : आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण

इयत्ता सहावी वेगवेगळ्या तुकडीत शिकणाऱ्या 11 मुलींनी इंग्रजीच्या शिक्षकाविरुद्धात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून शिक्षकाचा शोध घेत आहे. मुलींचा विनयभंग झाल्याचं पोलिसांनी मान्य केलं आहे, परंतु पीडित मुलींनी अद्याप शाळेच्या मुख्याध्यापकांकडे शिक्षकाची तक्रार केली नाहीये. या प्रकरणात बळी ठरलेल्या एका विद्यार्थिनीचं समुपदेश करत असताना त्या विद्यार्थिनीने कबूल केलं की, तिला इंग्रजीचे शिक्षकांनी तिला अयोग्यप्रकारे स्पर्श केला.  

अधिक वाचा  : दरीत अडकलेला बैल 25 दिवसांनी सुरक्षित बाहेर काढला

विद्यार्थिनीला इंग्रजीत आवड असूनही ती इंग्रजीच्या क्लासला का जात नाही, असं जेव्हा विचारलं तेव्हा मुलीने सांगितले की, इंग्रजीच्या शिक्षकांनी जेव्हापासून तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला, तेव्हापासून इंग्रजीचे शिक्षक आवडत नसल्याचं म्हटलं. पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, लहान मुलीने तिच्या मित्राला सांगितले की,अस्वस्थ असल्यामुळे ती गप्प आहे आणि तिच्या पालकांशी याबद्दल बोलण्यास तिला लाज वाटत होती. 

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मुलीची छेड काढण्यात आल्याचा आकडा मुलींनी बैठक घेऊन काढला आहे. पहिल्या विद्यार्थिनीने कबूल केल्यानंतर जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस आणखीन एका मुलीने सांगितले की, तिलाही इग्रंजीच्या क्लासला जायचे नाही. त्यावर दुसरी एक मुलगी म्हणाली की, तिलाही अयोग्य प्रकारे शिक्षकांनी स्पर्श केला होता. त्यानंतर मुलींनी एक गुप्त बैठक घेण्याचे ठरवले आणि एकूण किती जणांची छेड काढली गेली याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, 11 मुली लैंगिक छळाच्या बळी ठरल्या आहेत.

अधिक वाचा  : डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ...असा करा बचाव

 पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, या मुली गोंधळात होते की, त्यांच्या वर्गशिक्षकाचं चाळे सर्वांसमोर कसे आणणायचे हे त्यांना कळत नव्हते. मग शेवटी त्यांनी ठरवलं की, ज्या शिक्षिका त्यांना वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श काय हे शिकवत होत्या त्यांना हा प्रकार सांगितला.  दरम्यान बळी ठरलेल्या विद्यार्थिनीपैकी एकीने सांगितले की, व्याकरण शिकवताना शिक्षक तिच्या पाठ आणि खांद्यावरुन हात फिरवत तसेच हात हातात धरुन ठेवत असायचे. त्यानंतर शिक्षिकेने तात्काळ मुख्याध्यापकांना लेखी तक्रार पाठवली, त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शाळेत ही घटना घडत असल्याचं ऐकून पालकांना धक्का बसला आहे. 
 


 बळी ठरलेल्या विद्यार्थिनीपैकी एकी सांगितले की, दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्या. शाळेत जाण्यासाठी आम्ही खूप उत्साही होतो. त्यात मला इंग्रजी विषय खूप आवडीचा परंतु शिक्षक अशा प्रकारे वागत असल्याने मानसीकरित्या व्यथित झाले होते, त्यामुळे वर्गात मन लागत नव्हते. पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे यांनी या प्रकरणी सांगितले की, फरार शिक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायदा, 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान बळी ठरलेल्या मुली ह्या एकाच इयत्ते असून त्या वेगवेगळ्या तुकडीमध्ये शिकतात. त्यांनी एकत्र येत शिक्षकाविरुद्धात तक्रार द्यायची असं त्यांनी ठरवलं आणि तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी