इंजिनिअर व्हायचं स्वप्न झालं पुर्ण पण...., 8 व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण

suicide engineering student : काही निवडक संस्था वगळता खाजगी इंजिनिअरींग काॅलेजमधील विद्यार्थी भविष्याचा विचार करून झोपू शकत नाहीत. पालकांनीकर्ज घेऊन, जमीन विकून किंवा गहाण ठेवून आपल्या मुलांना इंजिनिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल की नाही हे माहीत नसते. याच नैराशातून पिंपरी चिंचवडमधील एकाने आत्महत्या केली. आज अभियांत्रिकीची पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत.

The dream of becoming an engineer has come true but...., before jumping from the 8th floor he wrote in a suicide note because
इंजिनिअर व्हायचं स्वप्न झालं पुर्ण पण...., 8 व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंजिनिअरींग काॅलेजमधील विद्यार्थ्यांना नोकरीची चिंता
  • प्लेसमेंट मिळत नसल्याने नैराश्य
  • पिंपरीचिंचवडमध्ये एकाने आत्महत्या केली

पुणे : प्लेसमेंट मिळत नाही या भीतीने एका इंजिनिअर तरुणाने इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. अशी माहिती समोर आली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस हद्दीतील सुसगाव येथे घडली. (The dream of becoming an engineer has come true but...., before jumping from the 8th floor he wrote in a suicide note because)

अधिक वाचा : अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा १८ व १९ जुलै रोजी होणार

हिंजवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय अमोल माटेगावकर (21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. माऊंट युनिक सोसायटीतील 8व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अक्षयने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून, त्यात त्याने प्लेसमेंट न मिळण्याच्या भीतीने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी