बापानेच मुलाच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून केला खून, 'हे' होत कारण

The father killed his son in pune : घटनेच्या दिवशी रात्री देखील युवराज आणि कुटुंबात पुन्हा भांडण झाले, त्यानंतर त्याने आई आणि मुलाला घरातून हाकलून दिले यामुळे त्याच्यात आणि वडीलात कडाक्याचे भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की वडिलांनी युवराजच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्याचा खून केला

The father killed his son in pune
बापानेच मुलाच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून केला खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बापानेच केला लोखंडी पाईप डोक्यात घालून खून
  • कौटुंबिक वादातून केली वडिलांनी मुलाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती
  • आज सकाळी सहा सुमारास सदर घटना घडली आहे.

पुणे  : एक जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी संकुलात सदर हत्येचा थरार घडला आहे. हत्येनंतर वडिलांनी स्वतः पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेत वडिलांना ताब्यात घेतले आहे. वडिलांनी आपल्या मुलाची हत्या ही कौटुंबिक वादातून केली असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी सहा सुमारास सदर घटना घडली आहे. युवराज अशोक सावळे असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

अधिक वाचा : "वेळ निघून गेलीय, आमचं चॅलेंज आहे तुम्ही या" राऊतांचं आव्हान

डोक्यात लोखंडी पाईपने वार करून मुलाचा केला खून

मिलेलेल्या माहितीनुसार, युवराज सावळे आणि त्याचे आई वडील आणि सोबत मोठा भाऊ देखील राहत होते. हे सर्वजण मोशी संकुलात राहत होते. युवराज आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे थोडेही जमत नव्हते. त्याचे कुटुंबातील लोकांसोबत सतत भांडण होत होते. यामुळे घरचे सर्व लोकं त्याला कंटाळले होते. गेल्या काही महिन्यांपासून युवराज लहान-लहान गोष्टीवरून आई-वडील आणि भावाशी भांडत असे. घटनेच्या दिवशी रात्री देखील युवराज आणि कुटुंबात पुन्हा भांडण झाले, त्यानंतर त्याने आई आणि मुलाला घरातून हाकलून दिले यामुळे त्याच्यात आणि वडीलात कडाक्याचे भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की वडिलांनी युवराजच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्याचा खून केला, अशी प्राथमिक माहिती आहे. हत्येनंतर वडिलांनीच भोसरी एमआयडीसी पोलिसांना घाटनेची माहिती दिली आणि आत्मसमर्पण केले.

अधिक वाचा ; सोन्याच्या भावावर दबाव, झाली किरकोळ घसरण, पाहा ताजा भाव 

पुण्यात हत्येचे सत्र सुरूच

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात हे प्रमाण अधिक असल्याचं देखील पहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात एका युवकाच्या हेत्येने मोठी खळबळ उडाली होती. गिरीधर गायकवाड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गिरीधर गायकवाड हा अमरावती जिल्हातील असून, त्याची हत्या पुण्यात झाली होती. गिरीधर गायकवाड याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे हत्या झालेला गिरिधर गायकवाड हा अमरावती कारागृहाचे अधिक्षक उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा होता.

अधिक वाचा : एमपीएससीकडून 800 ‘दुय्यम निबंधक’पदांसाठीची जाहिरात...

मंगळवारी रात्री गिरीधरच्या मोबाईलवर एक फोन आला होता

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गिरीधर गायकवाडच्या मोबाईल फोनवर एक फोन आला. गिरीधरने तो फोन उचलला आणि काही सेकंद त्याने समोरच्या व्यक्तीशी बोलला आणि फोन ठेवला. गिरीधरने याने जसाच फोन ठेवला तो तात्काळ घराबाहेर पडला. गिरीधरने घराबाहेर जात असताना त्याच्या भावाने विचारले कोणाचा फोन आला होता आणि तू कुठे चालला आहे. यावर गिरीधरने याने लगेच जाऊन येतो असं उत्तर दिले. मात्र , यानंतर गिरीधर घराबाहेर निघून गेला असता तो लवकर परतला नाही. बराच वेळ होऊनही गिरीधर घरी न आल्याने निखिलने त्याला पुन्हा फोन केला. तेव्हा फोनची एकदा रिंग वाजली आणि नंतर फोन बंद लागला. आता गिरीधरचा भाऊ निखीलने दिलेलेया फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी