FTII च्या हाॅस्टेलमधून येत होती दुर्गंधी, खिडकीतून बघितलं तर...

Pune FTII suicide : गोव्यातील एका FTII विद्यार्थ्याचा त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृतदेह कुजल्याचा वास येत असल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिस खून आणि आत्महत्येचा तपास करत आहेत.

The foul smell was coming from the FTII hostel room, when the door was broken, the body of the student was found
FTII हाॅस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह, खोलीतून दोन दिवसांपासून दुर्गंधी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एफटीआयआयच्या वसतिगृहाच्या खोलीतून शुक्रवारी 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
  • मृतदेह सडलेल्या अवस्थेत
  • प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय आहे.

पुणे : येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) वसतिगृहाच्या खोलीतून शुक्रवारी 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. तो FTII च्या 2017 च्या बॅचचा विद्यार्थी होता असे सांगितले जात आहे. डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या कुजल्यामुळे दुर्गंधी येत असल्याने शेजारील खोल्यांतील विद्यार्थ्यांना संशय आला. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेतला. (The foul smell was coming from the FTII hostel room, when the door was broken, the body of the student was found)

अधिक वाचा : Shinde-Thackeray-BJP : शिंदे गटाचा भाजप आणि ठाकरे गटाला धक्का 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की खोली आतून बंद होती. खिडकीतून विद्यार्थ्याला पाहून पोलीस पथकाने दरवाजा तोडला. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी मंगळवारी या विद्यार्थ्याला अखेरचे पाहिले असल्याचे पोलिसांना सांगितले. डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर कर्पे यांनी सांगितले की, मृतक अश्विन अनुराग शुक्ला हा FTII च्या सिनेमॅटोग्राफी कोर्सचा 2017 बॅचचा विद्यार्थी होता आणि मूळचा गोव्याचा होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अधिक वाचा : Maharashtra Rain: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

विद्यार्थ्यांची माहिती घेऊन पोहोचलेल्या पोलिसांनी प्रथम खोलीचा दरवाजा ठोठावला, त्याला उत्तर मिळाले नाही. त्यानंतर खिडकीतून डोकावले असता विद्यार्थ्याचा मृतदेह पडलेला आढळून आला. पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये गेले. संपूर्ण खोलीत एक भयानक वास येत होता. विद्यार्थ्याचा मृतदेह कुजला होता. या विद्यार्थ्याचा मृत्यू खूप पूर्वी झाल्याचे दिसत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

अधिक वाचा : मुंबै सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रविण दरेकर

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय आहे. मात्र, या प्रकरणाच्या तपासानंतरच हत्या की आत्महत्या यावरून पडदा हटणार आहे. मृतदेहाची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे पोलिसांचे मत आहे. मृत्यू खूप पूर्वी झाला होता. मृतदेह कुजल्यामुळे खोलीत दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही याची माहिती मिळाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी