Indapur plan crash : इंधन संपले आणि विमान थेट कोसळले इंदापूर इंदापूरमधील शेतात

पुणे
Updated Jul 25, 2022 | 14:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

The plane ran out of fuel and crashed in a field : मिळालेल्या माहितीनुसार, विमान ज्या शेतकऱ्याच्या शेतात कोसळले आहे. त्या शेतकऱ्याचे नाव दादाराम आबाजी बाराते असं आहे. दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात विमान कोसळल्यानंतर विमानाला पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. त्याचबरोबर सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी देखील योग्य बंदोबस्त तैनात केला आहे

The plane ran out of fuel and crashed in a field
इंधन संपले आणि विमान थेट कोसळले इंदापूर इंदापूरमधील शेतात   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रशिक्षण दिले जात असलेले विमान शेतात कोसळले आहे
  • विमानातील इंधन संपल्यामुळे हे विमान कोसळले असल्याची माहिती
  • सदर अपघातात पायलट भावना राठोड हिला किरकोळ दुखापत झाली

Indapur plan crash , पुणे : बारामतीतील कार्व्हर एव्हीएशन मार्फत प्रशिक्षण दिले जात असलेले विमान शेतात कोसळले आहे. सदर विमान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात कोसळले आहे. सदर विमान कोसळल्यानंतर गावातील लोकांनी विमान पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, सदर अपघातात पायलट भावना राठोड हिला किरकोळ दुखापत झाली आहे. या विमानात बारामतीतील कार्व्हर एव्हीएशनतर्फे प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमानाने काही अंतर पार करताच हे विमान खाली कोसळले.\

अधिक वाचा : एकाच सामन्यात झिरोवरून हिरो बनला टीम इंडियाचा हा ऑलराऊंडर

इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, विमान ज्या शेतकऱ्याच्या शेतात कोसळले आहे. त्या शेतकऱ्याचे नाव दादाराम आबाजी बाराते असं आहे. दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात विमान कोसळल्यानंतर विमानाला पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. त्याचबरोबर सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी देखील योग्य बंदोबस्त तैनात केला आहे. विमानातील इंधन संपल्यामुळे हे विमान कोसळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये महिला पायलट भावना राठोड या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा ; कॅन्टीनमध्ये गेले म्हणून वाचले..नाहीतर झाला असता मोठा अपघात

 

 

अधिक वाचा : आधार वोटर आयडी लिंक याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

घटनेत विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

दरम्यान, सदर विमान हे कोसळल्यानंतर शेजारील गावातील लोकांना या घटनेची माहिती मिळाली. यावेळी, गावातील लोकांनी तत्काळ घटनास्थळी भेट धाव घेतली आणि विमानात अडकलेल्या महिला पायलटला सुरक्षितपाने बाहेर काडण्यात आले आहे. सदर महिला पायलट ही किरकोळ जखमी झालू असून, तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, सदर घटनेत विमानाचे मोठे नुससान झाले असल्याची माहिती मिळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी