आईच्या डोक्यात मुलाने घातला ओंडका, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

The son brutally beat the mother in indapur, video viral : आई आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असते. स्वत:च्या सर्व आवडी-निवडी बाजूला ठेवून ती आपल्या मुलांसाठी राबत असते. मुले मोठी झाली की त्यांना आई नकोशी होते. मात्र, काही मुले पैशांसाठी आपल्या आईवर हात उचलतात.

The son brutally beat the mother in indapur, video viral
आईच्या डोक्यात घातला ओंडका, व्हिडीओ पाहून बसेल धक्का   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही पैशांसाठी मुलाने आपल्या आईच्या डोक्यात थेट ओंडका घातला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
  • धाकट्या मुलाने त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
  • वैजंयता जाधव यांनी आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली

पुणे : आई आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असते. स्वत:च्या सर्व आवडी-निवडी बाजूला ठेवून ती आपल्या मुलांसाठी राबत असते. मुले मोठी झाली की त्यांना आई नकोशी होते. मात्र, काही मुले पैशांसाठी आपल्या आईवर हात उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे घडली आहे. काही पैशांसाठी मुलाने आपल्या आईच्या डोक्यात थेट ओंडका घातला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, सदर घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झाला आहे. वैजयंता जाधव असं आईचे नाव असून, वैजयंता यांना मोठ्या मुलाने राहत्या घरी मारहाण केली तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारला आहे. वैजयंता यांच्या डोक्यात जसाच मुलाने ओंडका घातला त्यानंतर लगेच वैजयंता या जमिनीवर कोसळल्या.

अधिक वाचा ; मुंबईतील कुटुंबासाठी दिवाळी ठरली काळी, तिघांचा जागीच मृत्यू

वैजंयता जाधव यांनी आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावात घडली आहे. मोठ्या मुलाने डोक्यात ओंडका घातल्यानंतर वैजयंता या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांनी आपल्या मोठ्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वैजयंता यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वैजयंता यांच्या मोठ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आईला मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव दिलीप जाधव असं आहे. सदर प्रकरणात पेन्शन लाटण्यासाठी छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजयंता जाधव या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील रहिवासी आहेत.

अधिक वाचा ; उपोषणाचा तिसरा दिवस तरीही आमदार पाटील आपल्या मागण्यांवर ठाम  

धाकट्या मुलाने त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

सदर घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. यानंतर २५ तारखेला वैजंयता यांना चक्कर येऊ लागल्याने त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांनी आज इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्याला मोठ्या मुलगा दिलीप जाधव यांनी मारहाण केली असून,  शिवीगाळ, दमदाटी करुन डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारला आहे. अशा आशयाची तक्रार वैजंयता जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

अधिक वाचा ; वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त हे चार उपाय

अधिक वाचा  : करा हे घरगुती उपाय, या Natural हेअर पॅकने केस होतील काळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी