२५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

The teacher abused the minor girl : पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर २५ फटके मारीन अशी धमकी देऊन आरोपी शिक्षकाने अश्लिल कृत्य केले असल्याची घटना घडली आहे. सदर आरोपी हा  पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे

The teacher abused the minor girl
२५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केला मुलीवर अत्याचार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका शिक्षकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
  • २५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केले अत्याचार
  • चाकण पोलिसांनी नराधम शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला

पिंपरी चिंचवड  : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एका शिक्षकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देत  शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या महिनुसार अल्पवयीन मुलगी आणि नराधम शिक्षक हे जवळचे नातलग असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Threatening to hit 25 shots The teacher abused the minor girl)

अधिक वाचा ; फडणवीसांचे कट्टर विरोधक वकील सतीश उकेंच्या घरावर ईडीची धाड

२५ फटके मारण्याची धमकी देत शिक्षकाने केले अत्याचार

पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर २५ फटके मारीन अशी धमकी देऊन आरोपी शिक्षकाने अश्लिल कृत्य केले असल्याची घटना घडली आहे. सदर आरोपी हा  पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या नराधम शिक्षकाने  आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले आहे. आरोपी हा पीडितेचा आते  भाऊ आहे. तो खासगी शिकवणी वर्ग घेतो.  अशी देखील माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा : आता इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वय असेल सहा वर्षे

चाकण पोलिसांनी नराधम शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला

धक्कादायक म्हणजे, मागील वीस दिवसातील बाल लैंगिक अत्याचाराची ही घटना असल्याने घरी राहणाऱ्या आणि एकल राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षकाने केलेल्या या कृत्यानंतर पीडिता भयभीत झाली होती. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई - वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.   या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर नराधम शिक्षक हा घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस नराधम शिक्षकाचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा : मोफत अर्धा लिटर हवंय मग देशाच्या जुन्या पक्षाकडे जा.. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडल्या अनेक घटना?

दरम्यान, अल्पवयीन मुलीना आपल्या जाळ्यात ओडून त्यांच्यासोबत अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. ओळखीच्या व्यक्तीने शेजाऱ्याने, सोशल मीडियावर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या ११ घटनांमध्ये तीन घटनात वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी