जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण दिसल्यानं वेटरला मारहाण, वेटरचा मृत्यू : पहा व्हिडिओ

The waiter lost his life due to brutal beating by the two ; वेटरला मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वेटरच्या हत्येप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी हे फरार झाले आहेत. या प्रकरणी विशाल महादू रजाळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

The waiter lost his life due to brutal beating by the two
सुपात भाताचे कण दिसल्याने मरेपर्यंत वेटरला मारहाण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मटणाच्या सुपात भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आली
  • दोघांवर करण्यात आला हत्येचा गुन्हा दाखल
  • सासुरवाडी नावाच्या हॉटेलमध्ये घडली घटना

पुणे : मटणाच्या सुपात भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुण्यात गुन्हेगारी आणि भाईगिरीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.  गावगुडांना पोलिसांचा धाक राहिला नाहीये. गुरुवारी जुन्नर येथे एकाने तंबाखूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात फावडे टाकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पिंपळे सौदागर परिसरात असणाऱ्या सासुरवाडी नावाच्या हॉटेलमध्ये मटणाच्या सुपात भाताचे कण दिसल्याने वेटरची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

अधिक वाचा : जाणून घ्या कधी आमने-सामने येतील भारत आणि न्यूझीलंड संघ

दोघांवर करण्यात आला हत्येचा गुन्हा दाखल

वेटरला मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वेटरच्या हत्येप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी हे फरार झाले आहेत. या प्रकरणी विशाल महादू रजाळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, मंगेश पोस्ते (वय 19) असे हत्या झालेल्या वेटरचे नाव  आहे. दरम्यान वेटरला वाचविण्यासाठी भांडणात पडलेल्या इतर दोन वेटरला आरोपींनी मारहाण केली. या जखमी झालेल्यांमध्ये अजित मुटकुळे (वय 32) आणि सचिन भवर (वय 22) अशी त्याच्या सोबत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अधिक वाचा : 'हातातले खंजीर बाजूला ठेवा अन्...', राऊतांची CM शिंदेवर टीका 

सासुरवाडी नावाच्या हॉटेलमध्ये घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या हॉटेल सासुरवाडी या हॉटेलमध्ये घडली आहे. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र हे नेहमी या ठिकाणी जेवायला जात होते. त्यांनी आपल्या जेवणाची ऑर्डर वेटरला दिली. वेटरने आरोपींनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवणदेखील आणले.

मात्र, त्यांच्या मटणाच्या सूपमध्ये भाताचे काही कण आढळून आले, ते पाहून आरोपी विजयराज आणि त्याचा साथीदार हा प्रचंड चिडला. त्यानंतर त्यांनी वेटर अजित अमूत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मंगेश हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी आणि त्याचा मित्र हा हॉटेलमधून फरार झाले.

अधिक वाचा ; रिक्षा चालकाकडून अश्लील चाळे,घाबरलेल्या मुलीची रिक्षातून उडी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी