महिला आयोगाने घेतली 'त्या' प्रकरणाची दखल , खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा असे दिले निर्देश

The Women's Commission took note of the incident of atrocities : महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उठवणाऱ्या राज्य महिला आयोगने पंढरपूर येथे झाल्लेल्या एका अल्पवयीन मुलींवर तिच्याच बापाने केलेल्या अत्याच्याराची दखल घेतली

The Women's Commission took note of the incident of atrocities
खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा असे दिले निर्देश   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीडित मुलीची सुरक्षितता आणि पुनर्वसनासाठी कार्यवाही करण्याबाबतचे महिला आयोगाचे निर्देश
  • लवकरात लवकर कार्यवाही करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा
  • मुलीच्या गरोधरपणाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने थेट एका तरुणासोबत  घाईघाईत गर्भवती लेकीचा विवाह उरकून दिला

पंढरपूर : महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उठवणाऱ्या राज्य महिला आयोगने पंढरपूर येथे झाल्लेल्या एका अल्पवयीन मुलींवर तिच्याच बापाने केलेल्या अत्याच्याराची दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सदर प्रकरणात लक्ष घातले असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अश्या सूचना केल्या आहेत.

पीडित मुलीची सुरक्षितता आणि पुनर्वसनासाठी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संदर्भात एक ट्वीट देखील केलं आहे. त्यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल महिला आयोगाने घेतली असून यावर लवकरात लवकर कार्यवाही करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच पीडित मुलीची सुरक्षितता आणि पुनर्वसनासाठी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश सोलापूरच्या पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. असं चाकणकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याने सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आहे. यापेक्षा पुढे जाऊन बापाने केलेलं कृत्य पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल! कारण मुलीच्या गरोधरपणाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने थेट एका तरुणासोबत  घाईघाईत गर्भवती लेकीचा विवाह उरकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला असून तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडील आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे. 

आठ ते दहा महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती

बापाने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत एक – दोन नव्हे तर तब्बल गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. घटना पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात घडली आहे. आपली मुलगी गरोदर राहिली असल्याचं समजताच त्यांनी तिचा विवाह पुणे येथील तरुणाबरोबर लावून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी