Home Department Papers Stolen चोरांचा सुळसुळाट, महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्याला बसला फटका

पुणे
रोहन जुवेकर
Updated Dec 11, 2021 | 16:40 IST

Theft of Maharashtra Home Department documents फलटण शहरात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खासगी सचिवाच्या (स्वीय सचिव) कारमधून एक बॅग चोरण्यात आली आहे. या बॅगेत महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम होती. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांचे पथक तपास करत आहे.

Theft of Maharashtra Home Department documents
महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या कागदपत्रांची चोरी 
थोडं पण कामाचं
  • चोरांचा सुळसुळाट, महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्याला बसला फटका
  • महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या कागदपत्रांची चोरी
  • गृहमंत्र्यांच्या स्वीय सचिवाजवळची कागदपत्रे चोरली

Maharashtra Home Department official hit by thieves, theft of Maharashtra Home Department documents फलटण: चोरांचा सुळसुळाट झाला आहे. चोरट्यांच्या कारवायांचा फटका महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्याला बसला आहे. फलटण शहरात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खासगी सचिवाच्या (स्वीय सचिव) कारमधून एक बॅग चोरण्यात आली आहे. या बॅगेत महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम होती. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांचे पथक तपास करत आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी ए. आर. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव (स्वीय सचिव) बाबासाहेब सीताराम शिंदे सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये धुळदेव येथे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवार १० डिसेंबर २०२१ रोजी आले होते. विवाह सोहळ्यातून परत जातेवेळी बाबासाहेब सीताराम शिंदे यांना त्यांच्या कारच्या एका खिडकीची काच तुटली असल्याचे लक्षात आले. कारच्या मागच्या सीटवर ठेवलेली बॅग गायब असल्याचेही लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी तक्रार केली. तक्रारीआधारे तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी