मैत्रीणीला गिफ्ट देण्यासाठी मित्रांनी अवलंबला धक्कादायक मार्ग, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांचा कारनामा

Thefts started by friends to give as gifts to their girlfriends ; यांच्यातील एकजण बी ए एम एस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तर , दुसरा आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे

Thefts started by friends to give as gifts to their girlfriends
मैत्रीणीला गिफ्ट देण्यासाठी मित्रांनी सुरु केल्या चोऱ्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी अशाप्रकारे चोऱ्या केल्याची कबुली
  • हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने चोरी केले होते
  • आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत

पुणे : 'प्यार और जंग' में सब कुछ जायज है’। या हिंदी म्हणीप्रमाणे पुण्यात दोन विध्यार्थ्यांनी  आपल्या प्रेयसींसाठी असं काही केलं आहे हे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.  पुणे हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते, म्हणून आई – वडील काबाडकष्ट करून आपल्या मुलांना पुण्यात शिकवण्यासाठी पाठवतात. काही मुलं याचं चीज देखील करतात तर काही वाया देखील गेलेली आपण पाहिली आहेत.

दरम्यान, कधी-कधी शालेय अभ्यास क्रमात हुशार असणारे विद्यार्थीही गुन्हेगारी करत असल्याचं समोर येतं आहे. कारण पुण्यात मेडिकल क्षेत्रात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबला आहे. या विध्यार्थ्यांना व्यसन देखील होते. सदर विध्यार्थ्यानी पुण्यातील नामांकित सराफा दुकानातून दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या दोघांना हडपसर पोलिसांनी अटकही केली आहे. अनिकेत हनुमंत रोकडे (वय २३) आणि वैभव संजय जगताप (वय २२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने चोरी केले होते

हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांनी चोरी केल्याची तक्रार पोलिसात आली होती. ८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान , सदर , घटनेचा तपास करत असताना पोलिसांना त्याच दिवशी कोथरूड परिसरातील एका ज्वेलर्स मधूनही दोन तरुणांनी अशा प्रकारे चोरी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून तांत्रिक तपास करत आरोपींना अटक केली.

आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत

यांच्यातील एकजण बी ए एम एस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तर , दुसरा आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी अशाप्रकारे चोऱ्या केल्याची कबुली

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या जप्त केल्या आहेत. तर, या दोघांनी मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी अशाप्रकारे चोऱ्या केल्याची कबुली दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी