पुणे : सातारा, सांगली आणि कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा दि. 23 आणि २४ रोजी मार्च रोजी सहा तास बंद राहणार आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहने कात्रज मार्गे वळविण्यात येणार आहे. या नव्याने बांधण्यात आलेल्या बोगद्यामध्ये काही यंत्रणा बसविल्यामुळे हा महामार्ग काही तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. (Traffic changes in Katraj tunnel, such as alternative routes)
अधिक वाचा : Bus accident । मुंबई-बेंगलुरु महामार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेली लक्झरी बस पलटी, पाच जण गंभीर जखमी
पुणे - बेंगलोर महामार्गावरील व्हीएमएस आणि व्हीएसडी यंत्रणा बसवण्याचा एक भाग म्हणून नवीन कात्रज बोगदा .23 मार्चला रात्री 11 ते 24 मार्च 2023 ला पहाटे 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल. तीन तास सातारा ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
अधिक वाचा : राज्यातील अनेक भागात गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांला फटका
या वेळी साताऱ्याकडून होणारी वाहतूक जुना कात्रज बोगद्यापासून कात्रज चौक, नवले पूल, विश्वास हॉटेलमार्गे सर्व्हिस रोडने मुंबईच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. मात्र, मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी वाहने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.