पुणे : गेली अनेक दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हत्येचे देखील प्रमाण आपल्याला पहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात एका हाणामारीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. येरवाडा परिसरात सध्या या हाणामारीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. दिवसा झालेल्या या फ्री स्टाईल हाणामारीमध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तसचं या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.
अधिक वाचा : अगोदर पुरुष असण्याचा आरोप, मग लेस्बियन असल्याचा बहिष्कार
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. मात्र, याचं पुण्यात हत्या, हाणामारीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका तरुणाची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. पुण्याच्या नानापेठ परिसरात सदर युवकाची हत्येने पुण्यात खळबळ माजली आहे. तब्बल ३५ वार करत आरोपींनी या तरुणाला त्याची हत्या होती. सदर घटना ताजी असतानाच पुण्यात एका फ्री स्टाईल हाणामारीने पोलिसांची वचक संपली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येरवड्यामध्ये भर येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक वाचा : मराठी अभिनेत्रीला फसवणाऱ्या माजी नगरसेवकाला हायकोर्टाचा दणका
मिळालेल्या माहितीनुसार जागेच्या वादातून सदर प्रकार घडला आहे. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हाणामारी करणारे लोक हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा नंगानाच सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचं नागरिकांकडूम बोललं जात आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अधिक वाचा ; ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार ठरला?
दरम्यान, पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील नाना पेठ परिसरात सदर भीषण हत्याकांड घडलं होत. रात्री १ च्या सुमारास अक्षय वल्लाळ या तरुणाची चाकू भोकसून हत्या करण्यात आली. या तरुणावर चाकूचे तब्बल ३५ वर करण्यात आले होते. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे (दोघे रा. नवा वाडा, नाना पेठ) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस सदर घटनेचा सखोल तपास करत आहेत.