सातारा : भाजपचे राज्यसभा (Rajya Sabha ) खासदार (MP) उदयनराजे भोसले (Udayan Raje) हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. बेधडक स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या उदयनराजेंचं काहीवेळा भावनिक रुप पाहायला मिळतं. साताऱ्यातील अशीच एक घटना समोर आली असून उदयनराजेंच्या संवेदनशील कृतीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे.
उदयनराजे हे चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगी पुस्तकं विकत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. लहान वयातच उपजीविकेसाठी पुस्तक विक्री करणाऱ्या या मुलीला मदत व्हावी, म्हणून उदयनराजेंनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि तिच्याकडे असणारी सर्वच पुस्तके विकत घेतली. उदयनराजेंच्या या कृतीने उपस्थित असलेले सर्वजणच भारावून गेले. मुलीकडून विकत घेतलेली पुस्तके जवळच्या अनाथ आश्रमात देण्यात यावीत, अशा सूचनाही उदयनराजेंनी यावेळी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याआक्रमकपणे विरोधकांना सामोरे जाणारे उदयनराजे यावेळी काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, साताऱ्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून उदयनराजे भोसले यांच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.