[VIDEO]: उदयनराजे संतापले आणि म्हणाले, 'असं वाटतं एक कानाखाली द्यावी'

पुणे
सुनिल देसले
Updated Oct 12, 2019 | 16:48 IST

Udayanraje Bhosale angry: पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणा दरम्यान उदयनराजे संतापल्याचं पहायला मिळालं. पाहा राजेंचं भाषण.

Udayanraje Bhosale
उदयनराजे भोसले   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • पाटणमधील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी प्रचारसभा
  • प्रचारसभेसाठी उदयनराजे भोसले, आदित्य ठाकरेंची उपस्थिती
  • पाटण येथील सभेत उदयनराजे कडाडले
  • उदयनराजे भोसलेंचा जाहीर सभेत संताप

सातारा: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका लागला आहे. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली होती. जाहीर सभेत भाषण करताना उदयनराजे भोसले हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

उदयनराजेंच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहा

उदयनराजे भोसलेंचा संताप 

उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. भाषणात उदयनराजे भोसले म्हणाले, "गेल्या ३० - ४० वर्षांचा काळ पाहिला तर त्यावेळी शंभूराज आमदार नव्हते आम्ही तर कॉलेजमध्ये होतो. भाजप-शिवसेनेचा एकही खासदार तर सोडा आमदार या पश्चिम महाराष्ट्रात नव्हता. सर्व आमदार, खासदार काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीचे झाले. मात्र, ही जबाबदारी त्यांची होती ज्यांनी तुमच्या शेतात साधं पाणी सुद्धा दिलं नाही. मला आठवतय १९९६ साली शिवसेना-भाजपचं सरकार होतं, त्यावेळी मुंडे साहेबांकडे गेलो आणि त्यांना वस्तूस्थिती सांगितली. त्यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठं वरदान ठरली ही योजना. इतके लोकं तुमच्यावर प्रेम करतात, अनेक वर्षे निवडून देतात. तुम्ही कामं करणं तर लांबच राहीलं पण मला आठवतयं कॉलेज संपल्यावर साताऱ्याला प्रथम आलो त्यावेळी यांची भाषणं काय असायची. मला कळायचचं नाही की यांच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय? कारण इतका अहंकार... ज्यांच्यामुळे तुम्ही इतकी वर्षे निवडून आलेत त्यांचा विसर, आठवण तुम्हाला पडली नाही. केवळ निवडणुका आल्या तर सांगायचं मतदान करा आणि ते सुद्धा रुबाबात. तुम्हाला सांगतो आदित्य तुम्ही त्यावेळी शाळेत असाल. भाषण काय असायची माहितेय... किळस आणण्यासारखी भाषणं असायची. असं वाटतं की एक कानाखाली द्यावसं वाटतयं."

उदयनराजे भोसले खासदारकीच्या राजीनाम्यावर म्हणाले, "मी आजपर्यंत कोणाला केंद्रबिंदू मानलं असेल तर मतदारांना. माझ्या परिने तुमच्या हितासाठी जे-जे पाऊल उचलावी लागली आहेत ती पावलं मी उचललं आहेत. योजनेत भ्रष्टाचार झाला, पैसे खर्च झाले मात्र, योजना सर्वच अपूर्ण राहिल्या."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी