Udayanraje Bhosle : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जोडले हात, राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली विनंती

पुणे
विजय तावडे
Updated Oct 30, 2021 | 15:03 IST

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. तर दुसरीकडे उदयनराजेंनी संचालकांना हात जोडून विनंती केली...

Udayanraje Bhosle: BJP MP Udayanraje Bhosle joins hands, request made by NCP leaders
Udayanraje Bhosle : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जोडले हात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जरंडेश्वर साखर कारखाना कर्जवाटप प्रकरणी आलेल्या ED च्या नोटीसीची विचारणी
  • संचालक मंडळावर दबाव आणण्याची उदयनराजेंची रणनिती
  • उदयनराजेंनी संचालक मंडळाला हात जोडून विनंती केली आहे.

Udayanraje Bhosle सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीप्रणित सत्ताधारी पॅनेलमध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखाना कर्जवाटप प्रकरणी आलेल्या ED च्या नोटीसीची विचारणा करत संचालक मंडळावर दबाव आणण्याची रणनिती उदयनराजेंनी आखली आहे. आज उदयनराजेंनी संचालक मंडळाला हात जोडून विनंती केली आहे. ही बॅंक शेतकऱ्यांची आहे. त्यांची अर्थवाहिनी आहे. मेहरबानी करा त्यांची जिरवू नका, जिरवायची तर माझी जिरवा, असे आवाहन केले. (Udayanraje Bhosle: BJP MP Udayanraje Bhosle joins hands, request made by NCP leaders)

जिल्हा मध्यवर्ती बँकेला जरंडेश्वर साखर कारखाना कर्जवाटप प्रकरणी आलेल्या ED च्या नोटीसीची विचारणा करण्यासाठी उदयनराजे भोसले आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली.

उदयनराजे भोसले यांनी चारच दिवसांपूर्वी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांची भेट घेऊन ईडी प्रकरणाची माहिती लेखी स्वरूपात मागितली होती. त्यावर शुक्रवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये उदयनराजेंनी मागणी केलेल्या लेखी पत्रावर चर्चा झाली. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर संचालक मंडळाने काहीही माहिती देता येणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. 

यावर उदयनराजे म्हणाले, 'मला बॅकेवर आरोप करायचे नाही. बॅंक चांगली चालली आहे. पण बॅंकेच्या सभासदाच्या हिताच्या दृष्टीने बॅंकेच्या संचालक मंडळाने काय निर्णय घेतले. आणि ते का घेतले याबाबत प्रश्न उपस्थित केला म्हणजे टार्गेट करणे म्हणण हे चुकीचे आहे. माझं भांडण कोणा एका व्यक्ती किंवा संचालकाशी नाही. तर ही बॅंक सुरळीत चालली पाहिजे. बॅंक टिकली पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी जिल्हा बॅंकेत मी राहिलं पाहिजे.

'सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका' असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी