Amit Shah Pune :  शिवसेना विश्वासघातकी पक्ष, राज्यात वसूली सरकार, अमित शहांची राज्य सरकारवर टीका 

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Dec 19, 2021 | 20:47 IST

शिवसेना हा विश्वासघातकी पक्ष आहे, राज्यातील तीन चाकी सरकार असून वसूली कारभार सुरू आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. पुण्यात आयोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते. union minister amit shah criticized shivsena and mva government

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • राज्यातील तीन चाकी सरकार असून वसूली कारभार सुरू आहे
  • शिवसेना हा विश्वासघातकी पक्ष आहे.
  • महाराष्ट्र सरकारने इंधनाच्या किंमती कमी केल्या नाहीत

Amit Shah Pune : पुणे : शिवसेना हा विश्वासघातकी पक्ष आहे, राज्यातील तीन चाकी सरकार असून वसूली कारभार सुरू आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. पुण्यात आयोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही असेही शहा म्हणाले. (union minister amit shah criticized shivsena and mva government )

अमित शहा म्हणाले की, शिवसेना हा विश्वासघातकी पक्ष आहे. राज्यात तीन चाकांचे सरकार आहे. महाराष्ट्र सरकार म्हणजे तीन चाकी ऑटो रिक्षा असून ती सारखी पंक्चर होत आहे आणि चालतच नाही असे शहा म्हणाले. सध्याचे सरकार काहीच कामाचे नाही.  देशभरात १५ रुपयांची पेट्रोल डिझेल स्वस्त झाले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने इंधनाच्या किंमती कमी केल्या नाहीत. राज्यात राजकीय गुन्हेगारी आणि वसूलीचे सरकार सुरू आहे असे शहा म्हणाले. शिवसेना म्हणते की सत्ता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असेही शहा म्हणाले. शिवसेनेने राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. 

 

काँग्रेसकडून आंबेडकरांचा अपमान 


यावेळी शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. एक वेळ होती तेव्हा स्वराज बोलण्यामुळेही लोकांना भिती वाटायची. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी वाहून घेतले. तसेच काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्यांच्या मृत्यूनंतरही काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेसचे राज्य नसतानाच बाबासाहेबांना भारतरत्न जाहीर झाला. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर संविधान दिन साजरा करण्यास सुरूवात झाली, तर काँग्रेस या दिनाचा बहिष्कार करते असेही शहा म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी