शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणाला वेगळे वळण, पिडीता म्हणाली 'डांबून ठेवलं आणि खोटे आरोप करायला सांगितलं', पिडीतेच्या गौप्यस्फोटानंतर चित्रा वाघ यांना मोठा हादरा

victim made allegations against chitra wagh in kuchik case ; पिडीतेने धक्कादायक खुलासा करत म्हटलं आहे की, गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले होते. एवढंच नाहीतर पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी भाग पाडले होते. असा धक्कादायक खुलासा पिडीतेने केला आहे. त्याचबरोबर, महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे.

victim made allegations against chitra wagh in kuchik case
पिडीता म्हणाली 'डांबून ठेवलं आणि खोटे आरोप करायला सांगितलं'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चित्रा वाघ यांनी 'आपल्या डांबून ठेवून वाटेल ते आरोप करायला लावलं' - पिडीता
  • महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले – पिडीता
  • मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे – चित्रा वाघ

पुणे : काही महिन्यांपूर्वी एका तरुणीने शिवसेनेचे (shivsena) कामगार नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याचे गंभीर आरोप केले होते. सदर प्रकरणानंतर रघुनाथ कुचिक हे मोठ्या अडचणीत सापडले होते. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पिडीत तरुणीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी 'आपल्या डांबून ठेवून वाटेल ते आरोप करायला लावलं', असा गौप्यस्फोट पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे तरुणीने केलेल्या या आरोपानंतर चित्रा वाघ यांना मोठा हादरा बसला आहे.

अधिक वाचा : आजपासून वर्षभर एकाच राशीत राहणार राहू

महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले – पिडीता

दरम्यान, पिडीतेने धक्कादायक खुलासा करत म्हटलं आहे की, गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले होते. एवढंच नाहीतर पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी भाग पाडले होते. असा धक्कादायक खुलासा पिडीतेने केला आहे. त्याचबरोबर, महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे. चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहे, विशिष्ट यंत्रणा वापरुन माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईल वरुन मला मेसेज येत आहेत. असं घडवून आणलं गेलं असं पिडीतेने म्हटलं आहे. पुढे बोलताना पिडीत तरुणीने म्हटलं आहे की, सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून दिले जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती माझ्यावर करत आहे. हे पत्र कुचिक ने दिले आहे, असे भासवण्याचे काम करत आहे, अशा खुलासाच पीडित तरुणीने केला आहे.

अधिक वाचा : सूर्यास्तानंतर या वस्तूंचे दान करणे असते अशुभ, वाचा सविस्तर

मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे – चित्रा वाघ

पिडीत तरुणीने चित्र वाघ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी देखील एका व्हिडीओद्वारे एक खुलासा केला आहे.  त्यांनी म्हटलं आहे कि, पीडितेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरंतर वाईट वाटलंय पण हरकत नाही असे ही अनुभव  येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्याविरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

अधिक वाचा :​ 'या मुस्तफा' गाण्यावर मुंबई पोलिसांचे धमाकेदार परफॉर्मन्स 

नेमकं काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी एका तरुणीने शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. दरम्यान, माझा गर्भपात झाला असून, माझं गर्भपात झालेलं बाळ हे रघुनाथ कुचिक यांचंच असल्याचं म्हटलं होत. पीडितेने केलेल्या गंभीर आरोपानंतर कुचीक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही असं वैद्यकीय रित्या सिद्ध झालं असल्याचं सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचीक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असल्याचं पीडितेने म्हटलं आहे. पुढे बोलताना तिने म्हटलं आहे की, रघुनाथ कुचीक नेहमी मला मेसेज करायचे, आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मोर्फ करून वापरला गेला, मात्र तसं नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट सरकारी असते. ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ती  फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचं तरुणीने म्हटलं होत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी