Chandrakant Patil Speech In Rain: पाटलांनी केली पवारांची कॉपी; भर पावसात चंद्रकांत पाटलांनी सभेत ठोकलं भाषण

पुणे
भरत जाधव
Updated Nov 22, 2021 | 10:04 IST

Chandrakant Patil Speech In Rain: राज्यातील विधानसभेची (Assembly) निवडणूक (Election) लोकांच्या लक्षात राहिली तर ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (President of the Nationalist Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेमुळे.

chandrakant patil
पाटलांनी केली पवारांची कॉपी; पाऊसात पूर्ण केलं भाषण   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
  • पाऊस चालू असतानाही पाटलांनी पूर्ण केलं भाषण
  • २०१९ ची विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या सभेमुळे चर्चेला आली.

Chandrakant Patil Speech In Rain: पुणे : राज्यातील विधानसभेची (Assembly) निवडणूक (Election) लोकांच्या लक्षात राहिली तर ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (President of the Nationalist Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेमुळे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भर पावसामध्ये शरद पवार यांनी आपली एक सभा पार पाडली होती. ही सभाच निवडणुकीचं ‘वारं फिरवण्यास’ कारणीभूत ठरली असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून अनेकदा करण्यात आला.

पवारांची पावसातील सभेची आठवण राष्ट्रवादीच्या नेत्यांप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांच्याही आहे. पुण्यातील एका सभेत चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या सभेची आठवण करून दिली. रविवारी भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra State President) यांनी शरद पवारांच्या (Chandrakant Patil) सभेची कॉपी करत सभेतील आपलं भाषण पूर्ण केलं. 

पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे या चौकाचे नावे नाव ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आलं. फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले.पाऊस पडू लागला तेव्हा चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू होते. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही भाषण मध्येच न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

भर पावसामध्ये चंद्रकांत पाटील भाषण देत होते. बाजूला त्यांच्या मागेच एक व्यक्ती छत्री घेऊन उभी होती तर मंचावरील खुर्चांवर बसलेल्या काही मान्यवरांनाही डोक्यावर छत्री पकडली होती. मात्र चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते.१८ ऑक्टोबर २०१९ ला शरद पवारांनी भर पावसात सातारा या ठिकाणी सभा घेतली होती. पाच ते सहा मिनिटांच्या त्यांच्या भाषणाने त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सगळा नूरच पालटून टाकल्याचे सांगितले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी