पृथ्वीराज चव्हाणांचा शिवसेनेला 'हात' 

पुणे
Updated Oct 29, 2019 | 19:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाले तरी भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापनेच्या कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही. त्यात शिवसेनेला पृथ्वीराज चव्हाण यांनी 'हात' दिला आहे.

vidhansabha election 2019 prithviraj chavan congress offer shiv sena news in marathi
पृथ्वीराज चव्हाणांचा शिवसेनेला 'हात'   |  फोटो सौजन्य: Times Now

कराड : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाले तरी भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापनेच्या कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही. त्यात शिवसेनेला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'हात' देण्यासंदर्भातील वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव आल्यास आपण त्यावर विचार करू, तसेच आमच्या पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात प्रस्तावर ठेऊ असे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.  भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार की नाही याबाबत अजूनही त्या दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात ठेवले आहे. पण शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव अद्याप आला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिण मतदार संघातून विजयी झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांना शिवसेनेसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पाठिंबा देण्याची अप्रत्यक्ष ऑफर शिवसेनेला दिली आहे. तसेच या संदर्भात मित्रपक्षांशीही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ शकतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

विरोधीपक्ष नेत्याबाबत काँग्रेसची भूमिका

विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमच्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या जास्त आमदार आहेत. त्यामुळे जर भाजप-सेनेने सत्ता स्थापन केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधीपक्ष नेता असेल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

तर वंचितला फायदा झाला असता... 

लोकसभेत समविचारी पक्ष म्हणून वंचित आमच्यासोबत आली असती तर आज त्यांचे सहा ते सात खासदार लोकसभेत असते. स्वतः प्रकाश आंबेडकर खासदार झाले असते. आम्हीही बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहोत. तेही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...