पुणे : सध्या पुणे शहरात एक अनोखी आंदोलन होताना दिसत आहे. या आंदोलनात ‘जबरदस्तीने लग्न करणे म्हणजे वैवाहिक बलात्कार’ या मोहिमेअंतर्गत लोकांना एकत्र करून देशात आवाज उठवला जात आहे. या आंदोलनाचा टॅग वर्ड ठेवण्यात आला आहे "पुरुषांचा आदर करा, पुरुष देखील मानव आहेत". यासोबतच 'मर्द को भी दर्द होता है', 'फेमिनिझम इज कॅन्सर' अशा घोषणा आंदोलनात दिल्या जात आहेत. (Virtuous wife victimized men's protest )
अधिक वाचा : Viral Video : बघा बिग बॉस विजेता एमसी स्टॅन मारामारी करायला धावला
सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनच्या सक्तीच्या विवाहाविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे. या आंदोलनामध्ये प्रतिकात्मक जेलही बनवण्यात आले आहे. या आंदोलन पिडित पुरुषांसोबत महिलाची सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही सगळेच पुरुष बलात्कार किंवा अत्याचारी असतात असे नाही. त्यामुळे पिडित पुरुषांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली.
अधिक वाचा : मधुचंद्राच्या रात्री तिने नकार दिला, कारण कळताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली
या आंदोलनात सर्व पुरुष ‘मर्द को भी दर्द होता’ आणि ‘स्त्रीवाद हा कर्करोग आहे’ अशा घोषणा देत होते. तसेच या आंदोलनात पुरुष एलाॅन मस्कची पूजा करताना आणि वैवाहिक बलात्कार कायद्याला विरोध करताना दिसले. वैवाहिक बलात्कार कायदा न्याय्य असावा या मागणीसाठी पुरुषांनी हा निषेध नोंदवला. पुरुषांनी सांगितले की, या कायद्यांतर्गत पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यानंतर त्यांना शिक्षा भोगावी लागते.