Voting begins for Kasba and Chinchwad bypoll in Pune district of Maharashtra : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार 26 फेब्रुवारी 2023) सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. गुरुवार 2 मार्च 2023 रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
कसबा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मुख्य लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (मविआ) अशी आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात दुरंगी लढत आहे. तर चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप, मविआचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे.
कसबा मतदारसंघामध्ये 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत. तर चिंचवड मतदारसंघामध्ये 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 270 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. या मतदानासाठी 1250 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 510 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. या मतदानासाठी 725 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू आहे.
चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा
पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला आहे. यामुळे चुरस निर्माण झाली आहे. आज पोटनिवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी दोन्ही बाजूने ताकद पणाला लावली जाईल, असे चित्र आहे.