23 beer shops वारीतील महत्त्वाचे गाव असलेल्या वाखरीत २३ बिअरच्या दुकानांना परवानगी

पुणे
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 00:49 IST

पंढरपूरमध्ये जाण्याआधी वारीतल्या प्रमुख पालख्यांचा तळ वाखरी या गावात असतो. एवढे महत्त्वाचे असलेल्या वाखरी या गावात २३ बिअरच्या दुकानांना परवानगी मिळाली आहे.

wakhri gram panchayat approve 23 beer shops
वारीतील महत्त्वाचे गाव असलेल्या वाखरीत २३ बिअरच्या दुकानांना परवानगी 
थोडं पण कामाचं
  • वारीतील महत्त्वाचे गाव असलेल्या वाखरीत २३ बिअरच्या दुकानांना परवानगी
  • वारकरी संप्रदाय नाराज
  • वारकरी संप्रदायाची बिअरच्या दुकानांना दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी

wakhri gram panchayat approve 23 beer shops । वाखरी: पंढरपूरमध्ये जाण्याआधी वारीतल्या प्रमुख पालख्यांचा तळ वाखरी या गावात असतो. या गावात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालखीचा विसावा असतो. एवढे महत्त्वाचे असलेल्या वाखरी या गावात २३ बिअरच्या दुकानांना परवानगी मिळाली आहे.

वाखरी गावाच्या ग्रामपंचायतीने महिलांचा विरोध डावलून २३ बिअर शॉपींना परवानगी दिली आहे. बिअरच्या दुकानांना मिळालेल्या परवानगीमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. वारकरी संप्रदाय तसेच वाखरीतील महिलांनी बिअरच्या दुकानांना दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २३ बिअर शॉपींच्या मालकीने प्रत्येकी एक लाख प्रमाणे २३ लाख रुपये ग्रामविकास निधी दिला आहे. या बदल्यात वाखरी गावाच्या ग्रामपंचायतीने २३ बिअर शॉपींना परवानगी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी