Weather Forecast in Maharashtra : बळीराजासाठी पुढील पाच दिवस धडकी भरविणारे, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट 

Weather Forecast for next 5 days : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत येत्या  चार ते पाच दिवसांत विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस (Weather Forecast) पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने (IMD Pune) व्यक्त केला आहे.

weather forecast of maharshtra next five days important for farmers likely thundershowers in konkan marathwada western maharashtra says imd pune
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत येत्या  चार ते पाच दिवसांत विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस (Weather Forecast) पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने (IMD Pune) व्यक्त केला आहे.
  • मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
  • पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसांमध्ये  कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

पुणे : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत येत्या  चार ते पाच दिवसांत विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस (Weather Forecast) पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने (IMD Pune) व्यक्त केला आहे. अरबी समुद्र (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात  कमी दाबाचा पट्टा  निर्माण झाल्याने राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम होऊ शकत आणि आगामी चार ते पाच दिवस पाऊस वर्दी देण्याची शक्यता आहे.  मुख्यत्वे कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (
Western Maharashtra) आणि मराठवाडा (Marathwada) आदी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (weather forecast of maharshtra next five days important for farmers likely thundershowers in konkan marathwada western maharashtra says imd pune)

दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. काल (17 नोव्हेंबर) काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तुरळक प्रमाणात पडल्या. मुंबई, ठाणे जिल्ह्यातील गेल्या काही दिवसापासून पडलेला थंडावा नाहीसा झाला आहे. वातावरणात दमट हवेचे प्रमाण वाढल्याने  उकाडा वाढला आहे. वातावरणही ढगाळ पाहायला मिळते आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसांमध्ये  कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये वरूणराजा वर्दी देऊ शकतो. मराठवाड्यात बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत तर नंदुरबार, धुळेसह विदर्भातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे. 


हवामान खात्याने जारी केला 'यलो अलर्ट' 

हवामान खात्याने  तारीखेनुसाह 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

  1. 18 नोव्हेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. 
  2. 19 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये,
  3.  20 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, नांदेड 
  4.  21 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी