Weather update : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ , हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

Marathwada and Vidarbha Weather update :मंगळवारपासून राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा विक्रमी घसरला होता.

marathwada and vidharbha  update
शेतकऱ्यांची चिंतेत वाढ , हवामान खात्याने दिला 'हा' इशारा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला
  • शनिवारी पुण्यात १२.८  अंश सेल्सिअस किमान तर ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
  • हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागात मुसळधार पावसासह गारपिटचा इशारा देण्यात आला

Weather update  : पुणे : येत्या दोन दिवसानंतर मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (Rain and Hailstorm) होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार असल्याचं बोललं जात आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम (Kharif season) वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात (Rabbi season) निर्माण झालेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. दरम्यान , मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत असून, यानंतर आता राज्यात अवकाळी पावसाची (Non seasonal rain) स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाला सामोरे जावे ल्गाणार आहे.  (Weather update : marathwada and vidharbha Weather update)

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला

दरम्यान, मंगळवारपासून राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा विक्रमी घसरला होता. बहुतांशी ठिकाणाचं किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेलं होतं. परंतु आता उत्तर भारतात थंडीची लाट ओसरली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातही गारठा कमी होणार आहे. पुढील पाच दिवस देशात कुठेही थंडीची लाट येण्याची नसल्याचं देखील हवामान खात्याच्या वतीने अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत पहायला गेलं तर सध्या वायव्य आणि मध्य भारतात पश्चिमी चक्रावात आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहेत. त्यामुळे हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागात मुसळधार पावसासह गारपिटचा इशारा देण्यात आला आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून राज्यातही अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. 

शनिवारी पुण्यात १२.८  अंश सेल्सिअस किमान तर ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

दरम्यान, पुण्यात १२.८  अंश सेल्सिअस किमान तर ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.  तर , पुढील काही दिवस पुण्यात निरभ्र हवामान राहण्याची शक्यता आहे. पण दोन दिवसानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शनिवारी तर जळगावात १०.४ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

मागील काही दिवस उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता ओसरल्याचे दिसते आहे. विशेषत: उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रावरदेखील झाला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा खाली गेला होता. त्यातच आता पावसाची शक्यता असल्याने तापमानात वाढ होण्याची चिन्हे आहेत. देशाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम काही राज्यातील थंडीवर होत थंडी कमी होणार आहे. पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हवामानातील बदल शेतकऱ्यासमोर आव्हान निर्माण करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी