बापरे! पुण्यात मेट्रोचे खोदकाम करताना आढळली 'एवढी' मोठी हाडे

पुणे
अजहर शेख
Updated Nov 26, 2020 | 16:24 IST

While excavating the metro in Pune, big bones were found: ज्या ठिकाणी ही हाडं सापडली आहेत त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी आज (गुरुवारी) भेट दिली आहे.

While excavating the metro in Pune, big bones were found
बापरे! पुण्यात मेट्रोचे खोदकाम करताना आढळली 'एवढी' मोठी हाडे   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • हडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हडांपेक्षा मोठा आहे
  • तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दोनशे वर्षांपूर्वी सध्याचा मंडई परिसर हा मैदानी भाग होता
  • उस्मानाबाद जिल्ह्यातही आढळले होते अवशेष

पुणे: पुणे (pune) येथे मेट्रोचे (metro) काम सुरु असताना केलेल्या खोदकामात अवशेष आढळून आली आहेत. दरम्यान हे अवशेष अज्ञात प्राण्याचे असून, प्रचंड मोठ्या आकाराचे हे अवशेष आहे. पुणे येथे स्वारगेट ते शिवाजीनगर (swarget to shivajinagar) या मार्गावर मेट्रोचे खोदकाम जलद गतीने सुरु आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये हे अवशेष किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असावेत असा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. बुधवारी कामगारांनी हे खोदकाम सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मीटर अंतरापासून प्राण्यांची हाडे सापडू लागली. त्यानंतर कामगारांनी काळजीपूर्वक खोदकाम करत अनेक अवशेष बाहेर काढले. चाचण्या आणि संशोधनानंतर या अवशेषांचा काळ शोधता आल्यास यापूर्वी पुण्याचा कधीच समोर न आलेल्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या हडांपेक्षा मोठा

दरम्यान सदर अवशेष हे मंडई परिसरात आढळून आले असून, सापडलेल्या अवशेषातील हडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हडांपेक्षा मोठा आहे. सुरुवातीला असं वाटलं की ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी ही हाडं सापडली आहेत त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी आज (गुरुवारी) भेट दिली आहे. या हाडांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांचे रहस्य उलगडण्यास मदत होईल असं सांगितलं जातं आहे.

तज्ज्ञांच्या मते दोनशे वर्षांपूर्वी सध्याचा मंडई परिसर हा मैदानी भाग होता

सध्या सापडलेली ही हाडं पुरातत्वविभागाकडे सोपवण्यात आली आहेत. मात्र मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलेल्या या हाडांच्या आकारामुळे या हडांबद्दलची उत्सुकता वाढली आहे. नेमकी ही हाडे कोणत्या प्राण्याची आहेत? किती वर्षापूर्वीची आहेत? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहेत. दरम्यान काही इतिहास तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दोनशे वर्षांपूर्वी सध्याचा मंडई परिसर हा मैदानी भाग होता. येथे सर्कशीचे तंबू लावले जायचे. त्यामुळे या हाडांचे नक्की वय काय आहे, ती कधीपासून येथे आहेत याचा शोध लागल्यानंतरच हाडांबद्दल ठोसपणे सांगता येईल असं सांगितलं जातं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातही आढळले होते अवशेष

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावात देखील अवशेष आढळून आली होती. तर येथील येथील पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन विहिरीचे अवशेष आढळले. साधारणतः सातवाहन काळातील ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच विहिरीत काही हाडे आढळले. ती प्राण्यांची असल्याचे स्पष्ट झाले असून ती किती वर्षांपूर्वीची आहेत, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे. तेर गावाला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या खोदकामात अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरू असताना प्राचीन विहीर किंवा आडाच्या आकाराचे अवशेष सापडले. ते तत्कालीन विटांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. संशोधन, अभ्यासानंतरच हे अवशेष नेमके कसले, हे स्पष्ट होणार आहे. तीन मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर अनेक हाडे आढळली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी