शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीसाठी राज ठाकरेंनी का वापरला मास्क? जाणून घ्या का लक्षात आला मास्कचा नियम

पुणे
भरत जाधव
Updated Jul 21, 2021 | 11:44 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena President) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयार करताना दिसत आहेत.

Raj Thackeray use a mask
बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीसाठी राज ठाकरेंनी मास्क का लावला  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पुण्यात राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.
  • पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंना आठवला कोविड-१९ चा नियम
  • पुरंदरे यांच्या प्रकृतीच्या काळजीतून राज यांनी लावला मास्क.

पुणे: कधी-कधी आपल्या नेत्याने घेतलेली अॅक्शन बऱ्याच वेळेस कार्यकर्त्यांना बुचकळ्यात पाडत असते. नेत्याच्या त्या कृतीनंतर मग चर्चा सुरू होते आणि त्यामागील कारणे शोधली जाऊ लागतात. असंच काहीसं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बाबतीत झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena President) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयार करताना दिसत आहेत. नाशिक (Nashik) दौऱ्यानंतर राज सध्या पुण्यात (Pune)आले आहेत, येथे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून वेळ काढून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांची भेट घेतली. पण ही भेट एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. 

कोरोनाचा प्रतिबंध करायचा असेल तर काही नियमांचं पालन करण्यास जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितले. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला सामाजिक अंतर ठेवणं आणि मास्क लावणं हे दोन नियम बंधनकारक आहेत. राज्यातही  कोविड नियमांचे बंधनही सर्वांवर आले. यात मास्क सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या नियमाला नेहमीच फाटा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मास्क न लावता राज गेले होते. अनेक कार्यकर्मात राज ठाकरे विना मास्कचं दिसले होते. मास्कविषयी त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी मी मास्क लावणार नाही, अशी भूमिका वेळोवेळी मांडली.  

मग आज शिवशाहीर बाबबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे यांना मास्क का आठवला असा प्रश्न सर्वांच्या मनात. राज ठाकरे यांनी मास्क लावलेला पाहून अनेकजण आवक झाले. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे, राज साहेबांनी मास्क का लावला?काळजी करू नका राज ठाकरे यांनी मास्क का लावला या प्रश्नचं आम्ही तुम्हाला देत आहोत. राज यांनी मास्क वापरला त्यामागे कारणही तसे खास होते. राज पुणे दौऱ्यादरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला गेले. पुरंदरे यांचे घर पर्वती भागात असून तिथे पोहचल्यावर मास्क लावूनच राज यांनी पुरंदरे यांची भेट घेतली.

पुरंदरे यांचे वय व प्रकृतीच्या कुरबुरी या बाबी लक्षात घेत राज यांनी मास्कचा दंडक तिथे पाळला. तेथे दोहोंत काहीवेळ चर्चा रंगली. त्यानंतर राज तिथून निघाले. कारमध्ये बसताना राज यांनी आपल्या तोंडावरील मास्क काढला होता. उपस्थित सर्वांना हात उंचावून दाखवत राज तिथून निघाले. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे कुटुंबाचे फार जुने ऋणानुबंध आहेत. त्यातही शिवशाहीर पुरंदरे हे राज यांच्यासाठी पितृतुल्य आहेत. त्यामुळे पुण्यात जाणे असेल तर राज हे आवर्जुन पर्वती भागात जाऊन बाबासाहेबांची भेट घेतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी