Ketaki Chitale : पुणे : शरद पवार यांची नरकात जायची वेळ आली आहे अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे या अभिनेत्रीने शेअर केली आहे. केतकीला चोप द्यावा लागेल, आपल्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असे बोलणेच चुकीचे अशी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तसेच केतकीचा फोन नंबर व्हायरल करणार असल्याचेही पाटील ठोंबरे म्हणाल्या.
रुपाली पाटील म्हणाल्या आहेत की, 'कोण केतकी चितळे, तीच वय काय?, ती तिच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला अशी भाषा वापरते,एकत्र ही मनोरुग्णाने गंजेडी अभिनेत्री आहे. त्यात तिने लिहिले आहे की, ब्राम्हणांचा मस्तर, काय संबंध आहे का? राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असून अतिशय खालच्या पातळीवरचे पोरखेळ सुरू आहेत. हे प्रकार बंद झाले पाहिजे असे ठोंबरे पाटील म्हनाल्या. तसेच
मुळात केतकी़चे तेवढं वय सुद्धा नाही की तिने पवार साहेबांवर टीका कराची. केतकी चितळे आजारी असून तिच्यावर मेंदूवर उपचार सुरू आहेत. केतकीच्या आईवडिलांचं दुर्देव म्हणावं लागेल की तिला त्यांनी संस्कार दिलेले नाहीत. तिने पोस्ट करताना कुणी तरी ऍड.नितीन भावे याच नाव खाली लिहिले आहे. ही पोस्ट कुणी नितीन भावे नावाच्या माणसाने लिहिली नसून केतकीनेच लिहिली असावी असा अंदाजही ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
परंतु केतकीने हा जो काही खोडसाळ पणा केला आहे, तिला तिच्याच भाषेत, तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार आहे असा इशारा रुपाली ठोंबरे पाटील यांना दिला आहे. गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याची केतकीची पात्रता नाही. ती जे काही बोललेही आहे, त्याला काही अर्थ नाही. परंतु या पोस्टमुळे आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचबद्दल तिला चांगल्या चार पाच चापटी मिळाल्या हव्या तरच केतकी आजारातून लवकर बरी होईल असेही ठोंबरे पाटील म्हणाल्या.
केतकी चितळेचा आपण मोबाईल नंबर व्हायरल करणार अशी धमकी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तसेच ती जे काही बोलली आहे त्यसाठी वाईट साईट आणि अंत्यत खालच्या दर्जात तिला कमेंट करायला सांगणार आहोत. यांच्यामध्ये बदनामी केली म्हणून 504 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल करून असे विकृत जागेवर येत नसतात, आणि केतकी सारखे तर नाहीच नाही.मध्यंतरी ट्रोलर्सनी विरोधात बोलू नये, मात्र तिने आता कळसच गाठला आहे, छडी वाजे छम छम या उक्ती प्रमाणे तिला छड्या दिल्या की, ती जागेवर येईल आणि तिचे संस्कारही जागेवर येतील, असेही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.