पुणे : दाम्पत्याने केलेल्या अमानुष मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे (Pune) शहरातील वारजे माळवाडी परिसरात सदर घटना घडली आहे. आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. लता श्रीकांत माने असं मृत पावलेल्या ४७ वर्षीय महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून एका आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. सदर महिलेच्या हत्येची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : रंगीत फुग्यांसोबत सेक्स करणाऱ्या माणसाची गोष्ट
दरम्यान, सदर घटनेतील आरोपींची नावे वृषाली तानाजी बोडके आणि तानाजी नथू बोडके अशी आहेत. पोलिसांनी आरोपी तानाजी बोडके याला अटक केली आहे. आरोपीचा कसून तपास केला जात असून लवकरच आरोपी वृषाली बोडकेला अटक होण्याची शक्यता आहे. मृत लता श्रीकांत माने या ४७ वर्षीय महिला या पुण्यातील वारजे परिसरातील हिंगणे होम कॉलनी परिसरात वास्तव्याला होत्या. मृत लता माने यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी तानाजी बोडके यांच्या वडिलांकडून घर विकत घेतलं होतं. मात्र, आरोपी मृत महिलेला घर खाली कर असे म्हणत तगादा लावला होता. मात्र, लता माने यांनी घर विकत घेतले असल्या कारणाने घर सोडण्यास तयार नव्हत्या. आणि याचं कारणामुळे,रागातून आरोपी दाम्पत्यांनी शुक्रवारी (२५ मार्च) रोजी मृत लता माने यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत लता गंभीर जखमी झाल्या होत्या.
अधिक वाचा : MS Dhoni income: गेल्या वर्षात धोनीची तब्बल इतकी कमाई वाढली
लता माने यांना आरोपी दाम्पत्याने मारहाण केली असता लता माने या गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, त्यांना रुगणालयात देखील घेऊन जाण्यात आले मात्र, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. लता माने यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या परिचयातील असणाऱ्या सोनिया ओव्हाळ यांनी वारजे पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी तानाजी बोडके याला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. विकत घेतलेलं घर खाली करण्याच्या कारणातून महिलेची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.