केळीची लागवड करून एका एकरात तुम्ही कमवू शकता लाखो रुपये, या शेतकऱ्याने केला हा प्रयोग

You can earn millions of rupees from banana farming : शेतीचे योग्य नियोजन केल्यास शेती मोठ्या प्रमाणात फायदा देऊ शकते. याचा प्रत्यय मावळ येथील एका शेतकऱ्याला आला आहे. सदर शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीने शेती करत चक्क लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.

You can earn millions of rupees from banana farming
केळीची लागवड करून एका एकरात तुम्ही कमवू शकता लाखो रुपये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केळीचे पाने विकुन दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपयेही उत्पन्न त्यांना मिळते
  • सध्या काही झाडांना वीस ते पंचवीस किलोपर्यंत वजनाचे घड आले आहे
  • मित्रांच मार्गदर्शन घेऊन आपल्या एक एकरात त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं केळी घेण्याचं ठरवलं.

मावळ : शेतीचे योग्य नियोजन केल्यास शेती मोठ्या प्रमाणात फायदा देऊ शकते. याचा प्रत्यय मावळ येथील एका शेतकऱ्याला आला आहे. सदर शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीने शेती करत चक्क लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. पारंपरिक पिकाला फाटा देत सेंद्रिय पद्धतीने एका एकरात केळीचे पीक घेऊन मावळात एक वेगळाच प्रयोग केला. एका एकरात केळीचे पीक घेऊन वर्षाला सहा लाख रुपये कमवणं शक्य असल्याचं या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. साळुंब्रे गावच्या एका शेतकऱ्याने मोठा हा नफा कमावला आहे.

मित्रांच मार्गदर्शन घेऊन आपल्या एक एकरात त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं केळी घेण्याचं ठरवलं.

सदर शेतकऱ्याने केळीचे रोप हे बेंगलोर येथून आणले होते. सदर केळीचे रोप हे जवाहर देशी हे जातीचे आहे. पूर्ण रोपे गादी वाफे तयार करून लावले. सदर शेतकऱ्याने एकूण ५० हजार झाडे लावले होते. एका झाडांमध्ये पाच फूट अंतर ठेऊन ओळींमध्ये नऊ फूट अंतर ठेऊन लावली. वर्षभर सेंद्रिय पद्धतीने खत दिले. यात कोंबडी खत, शेणखत टाकले एक वेळेस फवारणी करून मशागत केली असता आज हे पीक अगदी जोमात आले आहे. अनेक मित्रांच मार्गदर्शन घेऊन आपल्या एक एकरात त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं केळी घेण्याचं ठरवलं. मावळमधील (Maval) साळुंब्रे गावचे प्रयोगशील शेतकरी (Farmer) बाबासाहेब राक्षे यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. या शेतात ते पारंपारिक पद्धतीने भात, ऊस, मिरची अशा प्रकारचे पिके घेत होते. मात्र आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं त्यांना वारंवार वाटत होतं. दरम्यान, त्यांनी हा प्रयोग केला आणि ते या प्रयोगात यशस्वी झाल्याचे पहायला मिळालं आहे.

सध्या काही झाडांना वीस ते पंचवीस किलोपर्यंत वजनाचे घड आले आहे

सध्या काही झाडांना वीस ते पंचवीस किलोपर्यंत वजनाचे घड आले आहे. सध्या भाव जरी कमी असला तरी एका एकरातील उत्पादनातून ऐंशी हजार खर्च वजा करता सहा लाख रुपये निव्वळ नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. शिवाय वातावरणात झालेला बदल ही केळी सहज सहन करते आणि याचा परिणाम उत्पन्नावर होत नाही. दरम्यान हे केळीचे झाडे जास्तीत जास्त सात ते आठ फूट उंच वाढत असल्याने वादळाचा याला त्रासही होत नाही. हे सर्व करताना त्यांना वर्षाला ऐंशी हजार रुपये खर्च आला आहे. 

केळीचे पाने विकुन दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपयेही उत्पन्न त्यांना मिळते

प्रत्येक केळीच्या झाडाला वीस किलो जरी उत्तर धरले आणि चारशे झाडेच हिशोबात धरली तरी सुमारे दहा टन उत्पादन मिळु शकते. विशेष म्हणजे केळीचे पाने विकुन दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपयेही उत्पन्न त्यांना मिळते. त्यामुळे , अनेक शेतकरी हे केळीच्या शेतीकडे वळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी