Viral Video: चित्रा वाघ, तुम्ही उद्या ब्ल्यू फिल्म टाकून त्याचंही उत्तर मागाल: रुपाली पाटील-ठोंबरे

Rupali Patil Thombare Ctiticized to Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांचा खास त्यांच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला आहे.  

you will put blue film and ask for its answer rupali patil thombare attack on chitra wagh nana patole viral video
'चित्रा वाघ, तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून त्याचंही उत्तर मागाल' 
थोडं पण कामाचं
  • चित्रा वाघ यांच्यावर रुपाली ठोंबरेंची जहरी टीका
  • नाना पटोले यांच्यावरील आरोपानंतर रुपाली पाटील-ठोंबरेंनी घेतला चित्रा वाघ यांचा समाचार
  • चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंवर केलेले गंभीर आरोप

Rupali Patil Thombare: पुणे: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काल (२० जुलै) एक व्हिडीओ ट्विट करून नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. त्याचसोबत ट्विटरवर नाना पटोले यांना टॅग करत 'नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेलमध्ये?' असा खोचक सवाल उपस्थित केला होता. मात्र, आता चित्रा वाघ यांच्या याच ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याचंही उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई? अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी आता चित्रा वाघ यांच्यावर केली आहे. (you will put blue film and ask for its answer rupali patil thombare attack on chitra wagh nana patole viral video)

नेमकं काय म्हणाल्या रुपाली पाटील-ठोंबरे?

'मुळात तुम्हाला नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील व्हिडिओ ट्विट टाकण्याचं प्रयोजन काय? तो तथाकथित व्हिडीओ खरा आहे खोटा आहे त्याची पडताळणी केली का?, त्या महिलेने तुम्हाला कोणतीही तक्रार केली का?', असा सवाल विचारत रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा: "काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात..." म्हणत Chitra Wagh यांनी ट्विट केला 'तो' VIDEO

'तिला कोणताही त्रास झाला असता आणि त्या महिलेने तुम्हाला तक्रार केली असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र, तुम्हाला विरोधी पक्षाच्या नेत्याच्या खासगी आयुष्यात सातत्याने ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेले नाही.' असे खडे बोल रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना सुनावले आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर व्हायरल व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं...." असं म्हणत चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय काँग्रेस, मुंबई काँग्रेस यांना ट्विट केलं होतं.

अधिक वाचा: "हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहणार" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांचं ट्विट

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती हॉटेलमध्ये एका महिलेच्या गळ्यात हात टाकून बसलेला आहे. हा व्हिडिओ पाठीमागून शूट करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओत दिसणाऱ्या या व्यक्तीचा चेहरा दिसू शकत नाहीये. पण व्हिडिओत नाना पटोले यांनी त्याच रंगाचा टी शर्ट परिधान केल्याचे फोटोजही दाखवण्यात आले असून तो त्यांचा व्हिडिओच असल्याचं म्हटलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी