कात्रज घाटात एसटीचा अपघात, तरुणाचा मृत्यू

पुणे
रोहन जुवेकर
Updated Nov 04, 2022 | 19:37 IST

young man died in a MSRTC bus accident at Katraj Ghat in Pune district : पुणे जिल्ह्यात कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस आणि दुचाकी यांची टक्कर झाली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

young man died in a MSRTC bus accident at Katraj Ghat in Pune district
कात्रज घाटात एसटीचा अपघात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कात्रज घाटात एसटीचा अपघात
  • एका तरुणाचा मृत्यू
  • एक तरुण जखमी

young man died in a MSRTC bus accident at Katraj Ghat in Pune district : पुणे जिल्ह्यात कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस आणि दुचाकी यांची टक्कर झाली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवर बसलेली एक व्यक्ती जखमी झाली. अपघातामुळे काही काळ कात्रज घाटात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. 

ठाणे शहर होणार चकाचक

19 उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती 

अपघातात भवानी पेठचा रहिवासी असलेल्या 18 वर्षांच्या अमोल टकले याचा मृत्यू झाला. तर अमोल सोबत असलेला पवन जाधव गंभीर जखमी झाला. पवनवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

एसटी महामंडळाची नाशिक-सांगली बस आणि दुचाकी यांची टक्कर झाली. बस पुण्याहून कात्रज घाटातून सातारच्या दिशेने जात होती. दुचाकीवरील दोघे खेड शिवापूरहून घाटातून पुण्याकडे येत होते. घाटात तीव्र उतारावर ‌बस आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातात वाढ होत आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अनेक अपघात झाले आहेत. रस्ते अपघातातील मृतांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी