तरुणाच्या हत्येने पुणे पुन्हा हादरले , भर चौकात गोळ्या घालून हत्या

पुणे
Updated Dec 24, 2021 | 10:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Young man shot dead in Bhar Chowk : गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे.  जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. मात्र ही हत्या कोणी केली, आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप अस्पष्टच आहे.

Young man shot dead in Bhar Chowk
तरुणाच्या हत्येने पुणे हादरले , भर चौकात गोळ्या घालून हत्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला
  • गोळीबारात नागेश कराळे यांचा जागीच मृत्यू झाला.
  • आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?

पिंपरी चिंचवड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येत आहे. पुणे येथे २ दिवसांपूर्वीच एका मुलाची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली होती. सदर हत्याकांडाने पुणे शहर हादरून गेले होते. आता पुण्यात पुन्हा एका तरुणाची हत्या झाली आहे. भर चौकात तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागेश सुभाष कराळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा खून झाल्याची माहिती आहे. (Pune was shaken again by the murder of a young man, shot dead in Chowk)

भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला

हत्येतील आरोपी हे चारचाकी वाहनांमधून आले होते. एकूण तीन आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे या तरुणाची हत्या करण्यात आली असून भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

गोळीबारात नागेश कराळे यांचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे.  जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. मात्र ही हत्या कोणी केली, आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप अस्पष्टच आहे. नागेश कराळे हे आपल्या वाहनात बसत असताना हे मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ चार ते पाच राऊंड फायर केले. 

आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात हत्येच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत देखील पिस्तूलमधून गोळ्या झाडून हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थेट आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी