पुणे : शहरात (Pune city) झिका विषाणूचा रुग्ण आढळला असून एका खासगी रुग्णालयात (private hospital) उपचार सूरू आहेत. हा रुग्ण मूळचा नाशिक (Nashik) असून तो पुण्यात आला होता. हा झिका (zika) बाधित रुग्ण पुण्यातील बावधन (Bawdhan) येथे सध्या वास्तव्यास आहे. ऑक्टोबर महिन्यात तो सुरतला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान झिकाचा रुग्ण सापडल्याने पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (Zika virus patient found in Pune, know the symptoms and prevention reasons)
अधिक वाचा : अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग
झिका विषाणूग्रस्त रुग्ण हा बावधन येथे राहत होता, रुग्णाच्या तपासणीचे निदान झाल्यानंतर त्या परिसरातील सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. या भागात घरोघरी सर्वेक्षण, कंटेनर सर्वे करण्यात आले. पण कुठेही एडीस डास उत्पत्ती आढळली नाही. या भागात धूरफवारणी करण्यात आली, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा : पंधरा दिवसांसाठी मुंबई शहरात संचारबंदी, पण का?
दरम्यान झिका विषाणू ग्रस्त रुग्ण हा गेल्या महिन्यात 16 नोव्हेंबरला हा रुग्ण ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी जहांगीर रुग्णालयात आला होता. यानंतर खासगी प्रयोगशाळेत या रुग्णाचे नुमने पाठवण्यात आले. त्यावेळी 18 नोव्हेंबरला तो झिका बाधित असल्याचे समोर झाले. यानंतर त्याचे नमुने हे पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवण्यात आले. एनआयव्हीच्या तपासणीत 30 नोव्हेंबरला हा रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले आहे. हा रुग्ण 6 नोव्हेंबरला पुण्यात आला होता. त्यापूर्वी 22 ऑक्टोबरला तो सूरतला गेला होता. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. पण खबरदारी म्हणून महापालिकेने पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान केले आहे.
ज्या व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाली आहे, त्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांमध्ये विषाणू पसरवितात. गर्भवती महिलांवर झिका विषाणू प्रभाव करतो. यामुळे झिका विषाणूची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅली होऊ शकते. मायक्रोसेफली हा एक दुर्मिळ जन्म दोष आहे, ज्यामध्ये बाळाचे डोके अपेक्षेपेक्षा लहान असते, जे मेंदूच्या विकासाच्या समस्यांशी संबंधित असू शकते.
झिका विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने एडीस डासांच्या चाव्याव्दारे पसरत असतो. एडीस जातीचे डास सहसा दिवसा चावतात. एखाद्या व्यक्तीस डास लावल्यामुळे संसर्ग झाल्यास झिका विषाणू त्यांच्या रक्तात काही दिवस तर काही लोकांमध्ये जास्त काळ राहू शकतो. या संक्रमित व्यक्तींना चावलेला डास इतर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग पसरवू शकतो. झिका विषाणूचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त स्त्रोतांसारख्या इतर माध्यमांद्वारेही होऊ शकतो.
अधिक वाचा : तानाजी सावंतांविरोधातील शिवसैनिकाने ठाकरेंना दाखवला हात
ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखी, शारीरिक अशक्तपणा, डोळे लाल होणे, उलटी, ही झिका विषाणूची लक्षणे आहेत. झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे अनेक इतर कारणांमुळे देखील दिसू शकतात.
डास अंधार असलेल्या ठीकाणी, ओलसर जागी किंवा साचलेल्या पाण्यात असू शकतात. त्यामुळे डास चावण्यापासून स्वताचा बचाव करावा. यासाठी, बग स्प्रेचा वापर करावा, मच्छरदाणीचा देखील उपयोग करावा. तसेच झिका विषाणूची लक्षणे दिसल्यास त्वरीत डाक्टरांशी संपर्क साधावा व योग्य उपचार घ्यावा. हा विषाणू करोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते.