Zomato Delivery Boy जेवणाचं पार्सल घेऊन आला अन् जबरदस्तीनं Kiss घेऊन गेला, आरोपी अटकेत

पुणे
भरत जाधव
Updated Sep 20, 2022 | 11:09 IST

फूड आणि इतर वस्तूंचे डिलिव्हरी करणारे कर्मचाऱ्यांकडून महिलांकडून गैरवर्तन केल्या जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. पुण्यातही Zomato Appच्या डिलिव्हरी बॉयने 19 वर्षीय मुलशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे.

 Zomato Delivery Boy delivered the parcel and  kissed the girl
Zomato Delivery Boy नं पार्सल देताच मुलीचा घेतला Kiss   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत घडला प्रकार
  • रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.

पुणे : फूड आणि इतर वस्तूंचे डिलिव्हरी करणारे कर्मचाऱ्यांकडून महिलांकडून गैरवर्तन केल्या जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. पुण्यातही Zomato Appच्या डिलिव्हरी बॉयने 19 वर्षीय मुलशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. जेवणाचे पार्सल (Food parcels) घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन (kiss) घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Zomato Delivery Boy came with a food parcel and forcibly kiss girl, the accused arrested)

येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Read Also : IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.  रईस शेख 40 वर्षांचा असून तो हा कोंढव्यात राहतो. दरम्यान शनिवारी रात्री एका 19 वर्षीय मुलीने Zomato App वरुन जेवणाची ऑर्डर दिली.  रात्री 9.30 च्या सुमारास रईस जेवणाची ऑर्डर घेऊन पीडित मुलीच्या घराच्या दरवाजावर आला. मुलीने जेवणाची ऑर्डर घेतल्यानंतर रईसने तिच्याकडे पाण्याची मागणी केली. पाणी पिऊन झाल्यानंतर धन्यवाद म्हणण्यासाठी रईसने मुलीचा हात धरला आणि दोन वेळा गालावर चुंबन घेतलं, असं मुलीने तिच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

Read Also : Chanakya Niti : चारित्र्यहीन स्त्री कशी ओळखायची?

पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमणावार फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली जाते. फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कागदपत्रांची तपासणी करतात का? त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी